चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*मोहरमच्या दहावीनिमित्त शेणगावात ताजियाची भव्य मिरवणूक; भाविकांनी घेतले दर्शन*
*हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी*
शेणगाव:- मोहरमच्या दहावीनिमित्त शेणगाव येथे पारंपरिक पद्धतीने ताजियाची मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने व शांततेत काढण्यात आली. गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताजियाचे दर्शन घेतले व हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाला अभिवादन केले. मोहरम हा करबला येथील शौर्य, त्याग आणि न्यायासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस मानला जातो.
मिरवणुकीदरम्यान धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गावातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडविले.
संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत शिस्तबद्ध सहभाग नोंदविल्याने मोहरमचा धार्मिक सोहळा निर्विघ्नपणे संपन्न झाला.



0 Comments