Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

कमिशनखोरीमुळे भेंडवी फाटा ते सिद्धेश्वर फाटा रस्त्याची लागली वाट?**कमिशन घेऊन अधिकारी सुस्तीत! कंत्राटदार बोगस काम करून मस्तीत?*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*कमिशनखोरीमुळे भेंडवी फाटा ते सिद्धेश्वर फाटा रस्त्याची लागली वाट?*

*कमिशन घेऊन अधिकारी सुस्तीत! कंत्राटदार बोगस काम करून मस्तीत?*

हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी 


राजुरा:- राजुरा तालुक्यातील भेंडवी फाटा ते सिद्धेश्वर फाटा या महत्त्वाच्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची योग्य तपासणी न करता कंत्राटदाराला मोकळे रान दिल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. "कमिशनखोरीमुळे अधिकारी सुस्तीत असून कंत्राटदार मात्र बोगस काम करून मस्तीत आहेत," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावरील परिस्थिती अधिकच गंभीर बनते. मोठमोठे खड्डे, चिखल आणि खराब झालेला डांबरी थर यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
नागरिकांनी या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार काम करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांचा सवाल
"जर रस्त्यांच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतील, तर काही महिन्यांतच रस्ते उखडण्यामागे नेमके कोण जबाबदार?"
भेंडवी फाटा ते सिद्धेश्वर फाटा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित विभागाचे अधिकारी काय भूमिका घेतात आणि चौकशी होते का, याकडे आता परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments