सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
*११ एप्रिल महात्मा जोतिबा फुले आणि १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून*
*सेवक लोकहित फाउंडेशन तर्फे सुरू असलेल्या हर घर संविधान या जनजागृती उपक्रमाचा आज तिसरा दिवस उत्साहात पार पडला !*
आज मिरज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या मान्यवर पदाधिकाऱ्यांना — श्री. राजेशजी देशमाने (जिल्हा कार्यवाह), श्री. सुधीरजी चपोरकर (माननीय जिल्हा संघचालक), श्री. योगेशजी शिरगुरकर (जिल्हा सहकार्यवाह), तसेच श्री. ओंकार शुक्ल (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सांस्कृतिक आघाडी भाजपा) यांना भारतीय संविधानाची पुस्तक स्वरूपातील प्रत सन्मानपूर्वक भेट देण्यात आली। या प्रसंगी संविधानातील समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांवर सखोल आणि समाधानकारक चर्चा करण्यात आली। तसेच, प्रत्येक नागरिकाकडे संविधान असणे, ते वाचून आपले हक्क व अधिकार समजून घेणे आणि ते आपल्या दैनंदिन आचरणात उतरवणे ही काळाची गरज आहे, यावरही विशेष भर देण्यात आला।
“हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव करून देणे आणि जबाबदार नागरिक घडवणे हेच या उपक्रमाचे खरे ध्येय आहे।”
या उपक्रमाचे मान्यवरांनी मनापासून कौतुक करत हर घर संविधान या उपक्रमाचे स्वागत व प्रशंसा केली। हर घर संविधान या उपक्रमाद्वारे संविधानाची जाणीव प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार अधिक दृढ होत आहे असे मत संस्थेचे अध्यक्ष उमरफारुक ककमरी, यांनी व्यक्त केले या भेटीदरम्यान
संचालक प्रशांत कदम,
महावीर (तात्या) कांबळे,
सांगली जिल्हाध्यक्ष संतोष तांदळे,जिल्हा सचिव सुरज जमने,मिरज अध्यक्ष फरहान पखालीआदी मान्यवर उपस्थित होते।”



0 Comments