चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*विद्युत पुरवठा कार्यालया च्या विरोधात मोबाईल टावर वर चढून वीरगिरी आंदोलन करण्याचा इशारा*-सय्यद शब्बीर जागीरदार
जिवती:-जिवती तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमर्जी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सामान्य ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याचा धडाका सुरू केले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या मनमर्जीच्या विरोधात सय्यद शब्बीर सय्यद नुरुद्दीन या सामान्य विज ग्राहक धारकांनी. तहसीलदार जिवती, उपअभियंता विद्युत पुरवठा कार्यालय जिवती, पोलीस निरीक्षक जिवती यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले की माझ्या घरी साधे डिजिटल वीज मीटर होते. ते मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्यात आले. स्मार्ट मीटर लावताना मला माहिती देण्यात आली नाही. माझी परवानगी ही घेण्यात आली नाही. विनापरवानगीने माझ्या घरी स्मार्ट मीटर बसवण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेबांनी दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी मंत्रालयात सांगितले की सामान्य घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर लावण्यात
येणार नाही आणि स्मार्ट मीटर लावण्याच्या अगोदर संबंधित ग्राहकाची ना हरकत असणे गरजेचे आहे. असे स्पष्ट शब्दात बोलले. मी संबंधित अधिकारी जयस्वाल यांना वारंवार विनंती केली की आपण लावलेला स्मार्ट मीटर बदलून माझ्या घरी साधे डिजिटल मीटर लावण्यात यावे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी माझी विनंती ऐकली नाही. म्हणून सामान्य ग्राहकाला आज विद्युत पुरवठा विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याची पाळी आली आहे. या चार दिवसात स्मार्ट मीटर काढण्यात यावे साधे डिजिटल मीटर लावण्यात यावे अन्यथा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी मोबाईल टावर वर चढून आंदोलन करण्यात येईल या आंदोलन दरम्यान माझ्या जिवाला काही झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी जयस्वाल जबाबदार राहणार असा इशारा निवेदनातून सय्यद शब्बीर यांनी दिला आहे.



0 Comments