Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

पकडीगडम जलाशयाची मुख्य भिंत झाडे झुडपानी वेढली दगडी पिचिंग धोक्यात

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

पकडीगडम जलाशयाची मुख्य भिंत झाडे झुडपानी वेढली दगडी पिचिंग धोक्यात .  कोरपना जिवती तालुक्यातील सीमेवर असलेल्या आदिवासी भागातील सिंचनाकरिता म्हणून निर्माण करण्यात आलेल्या पाटबंधारे विभागाचे पकडी गड्डम जलाशय 1994 95 पासून मुख्य भिंत जलाशयाच्या आतील भागात निंबाचे करंजी पळस बाभूळ दूध कुळा या जातीचे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे निर्माण झाले असून दगडी भिंतीला दगड पिचिंग अस्ताव्यस्त होऊन भेगा पडण्याची भीती निर्माण झाली आहे गेल्या पंधरा वर्षापासून साफसफाईकडे पाटबंधारे विभागाने पाठ फिरवल्यामुळे आतील भागामध्ये मोठ्या प्रमाणात झुळूप निर्माण झालेली आहेत उपरोक्त प्रकल्प हा डोंगर पायथ्याशी व जंगलव्यापचे क्षेत्रात असल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येते या झाडाझुडपामुळे रानटी डुकरे यांच्या कळपाचे निवारे तयार झाल्यामुळे या ठिकाणी पर्यटन म्हणून पाहणी करा साठी येणाऱ्या कुटुंबामध्ये भीती निर्माण झाली आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात झाड तयार झाल्यामुळे अनेक ठिकाणी दगड पिंचींग नासघुस झाल्याने तसेच मुख्य भिंतीवर वेस्ट वेअर कडे जाण्यासाठी मुख्य भिंतीवरून ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे मोटरसायकल किंवा चार चाकी वाहन जाता येत नाही सदर रस्त्यावर गिट्टी मुरुमाचे आच्छादन करण्यात यावे या रस्त्यावर अपघात होऊन पर्यटकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे या पंचकोशीतील कारगाव धानोली येरगावण पिपर्डा पारगाव मर्कागोंदी येथील अनेक कुटुंब आपल्या परिवारासह जलाशय व जंगल पाहण्यासाठी म्हणून येत असतात या भागातील नागरिकांनी झाडे झुडपे काढण्यात यावी तसेच रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments