Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

महावीर कांबळे यांचा मिरजेच्या आमदारांवर घणाघाती सवाल – बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या स्वागताकडे जाणूनबुजून पाठ फिरवली का?*

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 

*महावीर कांबळे यांचा मिरजेच्या आमदारांवर घणाघाती सवाल – बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या स्वागताकडे जाणूनबुजून पाठ फिरवली का?*

मिरज शहरातून सांगली येथे रवाना होत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे मिरज शहरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आंबेडकरवादी कार्यकर्ते, बहुजन समाजातील नागरिक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मात्र या स्वागत सोहळ्यात माजी सामाजिक न्याय मंत्री तसेच मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश खाडे हे गैरहजर राहिल्याने बहुजन तसेच आंबेडकरवादी समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत आंबेडकरवादी कार्यकर्ते महावीर तात्या कांबळे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या भव्य पुतळ्याच्या स्वागताचा हा ऐतिहासिक क्षण असताना मिरजेचे आमदार कार्यक्रमाला उपस्थित नसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
“ज्या व्यक्तीने सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम केले, त्याच व्यक्तीने बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या स्वागताकडे जाणूनबुजून पाठ फिरवली का?” असा घणाघाती सवालही महावीर तात्या कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
या घटनेमुळे मिरज परिसरातील बहुजन तसेच आंबेडकरवादी जनतेत नाराजीची भावना व्यक्त होत असून, या विषयावर विविध स्तरातून चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments