Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

इंदिरानगर सांगली येथील पाण्याची पाइपलाईन व्यवस्थित बसवून, ड्रेनेजची व्यवस्था करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी सांगली महानगरपालिकेला सांडपाण्याने अभिषेक घालेल.वंचितचा आक्रमक पवित्रा...

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषा कांबळे


इंदिरानगर सांगली येथील पाण्याची पाइपलाईन व्यवस्थित बसवून, ड्रेनेजची व्यवस्था करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी सांगली महानगरपालिकेला सांडपाण्याने अभिषेक घालेल.

वंचितचा आक्रमक पवित्रा...

सांगली
दि. 5 मार्च 2026

सांगली शहरातील इंदिरानगर परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाईन गटारीमधून गेलेली आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना स्वच्छ, पुरेसे व नियमित पाणी मिळत नाही. गटारीमधून पाइपलाईन गेल्यामुळे पाणी दूषित असण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.सदर भागात पाण्याचा दाब कमी असून अनेक वेळा पाणी अत्यंत कमी प्रमाणात येते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने घर तिथे शौचालय, घर तिथे नळ कनेक्शन ही महानगरपालिकेची घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे. तरी आपणास विनंती आहे की, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करण्याचे आदेश द्यावेत व गटारीमधून गेलेली पाइपलाईन सुरक्षित ठिकाणी हलवून नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच इंदिरानगर परिसरात ड्रेनेजची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेला गटारीचे सांडपाणी घेऊन अभिषेक घालेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे, ज्येष्ठ नेते मधुकर शेसवरे, अनिल कांबळे यासह भागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments