Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिवती तालुक्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी – युवक काँग्रेसचे निवेदन

महाराष्ट्र संवाद न्युज 


जिवती तालुक्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी – युवक काँग्रेसचे निवेदन
जिवती : जिवती तालुक्यातील गाव जोडणी रस्ते सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात युवक काँग्रेसचे जिवती तालुका उपाध्यक्ष प्रदीप काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, माराई पाटण येथील गंगामाता देवस्थानाची यात्रा दिनांक 3 मार्चपासून सुरू होत असून यात्रेसाठी तालुक्यातील तसेच बाहेरील हजारो भाविक येणार आहेत. त्यामुळे जिवती तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता तसेच घाट परिसर तात्काळ दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. खराब रस्त्यांमुळे यात्रेकरूंना त्रास होण्याची शक्यता असून अपघाताचा धोका देखील वाढत आहे.
युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला जिवती तालुक्यातील सर्व गाव जोडणी रस्ते तसेच माराई पाटण गंगामाता देवस्थानाकडे जाणारा मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कामे सुरू करावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments