Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

निकृष्ट दर्जाच्या सिमेंट काँक्रीट बंधारा बांधकामाची चौकशी करा-हकानी शेख*

जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*निकृष्ट दर्जाच्या सिमेंट काँक्रीट बंधारा बांधकामाची चौकशी करा-हकानी शेख* 

जिवती:-तालुक्यात होत असलेल्या विकास कामावर शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र, कोट्यावधी रुपयाचा कंत्राटदाराच्या व संबंधित विभागाच्या माध्यमातून चुराडा होत असल्याचा निकृष्ट दर्जाच्या कामावरून दिसून येत आहे. तालुक्यात वन विभागाच्या माध्यमातून झानेरी मालगुडा या गावाच्या शिवारात नाल्यावर सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याच्या बांधकामात निष्कृष्ट दर्जाचा साहित्य वापरण्यात आले व अंदाजपत्रकानुसार लोखंड वापरण्यात आलेले नसल्यामुळे बंधारा जास्त काळ टिकणार नसल्याचे अंदाज लावण्यात आला आहे. कारण की त्या बंधाऱ्याच्या बांधकामाची फोटो काढण्यात आले असून या बंधार्‍यात लोखंड साहित्य कमी प्रमाणात वापरण्यात आले. नीमा प्रमाणे जे सिमेंट वापरायचे असून ते सिमेंट न वापरता भलताच सिमेंट वापरण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवती तालुका अध्यक्ष हकानी शेख यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय जिवती येथे दि.४ फेब्रुवारी रोजी निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी. दोशी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, संबंधित इंजिनियरवर विभागीय कारवाई करण्यात यावी, संबंधित वन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, जोपर्यंत चौकशी होत नाही. तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराला कामाच्या मोबदला देण्यात येऊ नये, काय चौकशी झाली व काय कारवाई झाली त्याचा अहवाल तक्रार करताना देण्यात यावा अशी मागणी निवेदना मार्फत करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments