जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
दुल्हेशहा बाबा रहे अलैह कुसल शरीफ वार्षीक उत्सवाला प्रारंभ : (कोरपना ता. कोरपणा येथून जवळ असलेल्या निसर्ग रम्य नाल्याच्या काठावरील हजरत अब्दुल रहमान दुल्हेशहा बाबा कुसळ येथे दरवर्षीप्रमाणे होळीच्या पूर्वी यात्रा भरल्या जाते या ठिकाणी तालुक्यातील संपूर्ण परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उर्स साजरा करतात हजरत दुल्हेशाह बाबा यांचा दरगाह पुरातन काळातील असून दुल्हेशहा नवरदेव बनुन दरवन कढून वरात येत असताना घोडयासह या ठिकाणी अदुष्य झाल्याचे पुरातन काळातील लोक म्हणतात काही काळा नंतर कुसळ जातीचे गवत प्रसिद्ध होते गवत कापताना दगडी मजार जमीनीवर येताना दिसले व स्वतांत्र्य पुर्व काळापासून तिथे उत्सव साजरा होतो गाव कुशीत पुरातन गढी आज ही पडक्या स्थितीत दिसून येतात गाव भोवती धान्य साठवणुकीचे पेव दिसून येतात शेतात काम करताना अनेक वेळा पुरातन काळातील शेती साहीत्य भांडीकुंडी दिसतात जवळच असलेल्या देवघाट येथे पुरातन मुर्ती मंदीर यासह जुण्या ओळखीच्या वस्तू नजरेत येतात यावरून कुसळ व रिट देवघाट पूर्व काळातील गाव असल्याचे नजेरस अनेक वस्तु दिसतात दुल्हेशहा बाबा ट्रस्ट कमेटी कडून येथे अनेक सुविधा भाविक भक्ता साठी दिल्या जातात येथे 3 दिवस लंगर वाटल्या जाते या वर्षी दि २७ / २ / २०२६ ला कुरानखानी परछम कुशाई दि २ ८ ला कोरपना जामा मस्जीद येथून संदल चादर मजारवर ढाल ताश्या च्या निनादात चढविल्या जात परीसरात सह जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरून संदल येतात दि १ मार्च ला कव्वाली व कौमी एकता समारोह पार पाडल्या जाते या कार्यक्रमात मा आमदार देवराव भोंगळे प्रमुख्याने उपस्थीत राहणार आहे यवतमाळ आदिलाबाद आसिफाबाद गडचिरोली भागातील अनेक भावीक भक्त दर्शनासाठी येतात कोरपना येथिल ठानेदार लता वाढीवे यांनी प्रत्येकक्ष यात्रा ठिकाणी पाहणी करूण पार्कीग व्यवस्था लोकाची गर्दी लक्षात घेता येथे चोख बंदोबस्त साठी नियोजन केले कमेटी चे अध्यक्ष आबिद अली राजु कादरी अजिम बेग इरफान शेख उर्स कमेटी चे शहेबाज अली मोहब्बत खान सुहेल अली नईम शेख इसराईल नदीम सय्यद बाबाराव सिडाम वैभव किन्नाके शुभम पंधरे कपिल आत्राम पियुश आत्राम शुभम कोडपे हे सर्व व्यवस्थेसाठी . प्रयत्न करीत आहे ३ दिवस लंगर व्यवस्था सलीम पारेख जुनैद अली मकसुद पारेख यांच्या कडून केल्या जाते



0 Comments