Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

*जिवती तालुक्यातील जलजीवन मिशनची संपूर्ण कामे निकृष्ट दर्जाची व बोगस झालेली आहेत. संपूर्ण कामाची कसून चौकशी- सय्यद शब्बीर जागीरदार* जिवती:- जिवती तालुका हा दुर्गम असून या तालुक्यात जल जीवन मिशन च्या माध्यमातून संपूर्ण गावात नळ योजनेचे कामे सुरू आहेत हे कामे शासनानी अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेट ) करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. परंतु जिवती तालुक्यातील कोणत्याच गावातील नळ योजनेचे कामे हे नियमानुसार व अंदाजपत्रकानुसार कामे करण्यात आलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात या जन जन मिशनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे व बोगस दर्जाचे कामे करण्यात आली आहे. कामापेक्षा जास्त बिल संबंधित यंत्रणेने अदा केली आहे. जिवती तालुक्यात १४४ कामे मंजूर झाले व सुरू झाले त्या कामामधून आज पर्यंत १९ कामे पूर्ण झाली आहे. व १२५ कामांना निधीमुळे अचानक ब्रेक लागला आणि कामे अपूर्ण राहिली आहे. अंदाजपत्रका नुसार ( इस्टिमेट ) प्रत्येक गावात नळ योजने करिता पाईपलाईन ही ३ फुट जमिनीमध्ये खोल टाकायची आहे ती कमी खोदकाम करून पाईपलाईन टाकलेली आहे. व ज्या ठिकाणी वळण डांबरीकरण, सिमेंट रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. त्या ठिकाणी काँक्रीट करायचे आहे ते केलेले नाहीत. म्हणून रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे दररोज अपघात होत आहे. रायझिंग करणे खोदकाम करणे खडक असेल तर त्या ठिकाणी ब्लास्टिंग करणे व खोली ३ फूट खोदणे हे अनिवार्य असून सुद्धा परंतु ते खोद काम कमी करण्यात आले आहे. विहिरी पासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिंगल ६ KG च्या अखंड काळा पाईप टाकायचे आहे परंतु ते २० फूट चे ४ KG कमी साईज वाले पाईप टाकण्यात आले आहेत. अंदाजपत्रकानुसार विहीर खोदकाम करण्याअगोदर त्या ठिकाणी टेस्टिंग बोरवेल मारून ते पाणी टेस्टिंगसाठी पाठवायचे होते परंतु ते नियमानुसार टेस्टिंगला पाठवलेले नाही त्यामुळे पाण्याची टेस्टिंग नव्याने करण्यात यावी. पाण्याच्या टाकीची डिझाईन ही गावाच्या क्षमतेनुसार गावानुसार वेगवेगळी डिझाईन करायला पाहिजे होती. परंतु तसे केलेले नाही सर्व तालुक्यातील एकच डिझाईन चे बांधकाम केलेले आहे. पाण्याच्या टाकीचे बेस्मिट ( पाया ) हे १६ MM व १२ MM चे लोखंडी राड वापरून करायला पाहिजे होते. परंतु सर्व ठेकेदारांनी १२ MM व १० MM चे लोखंडी राड वापरून बेस्मिट बांधकाम केलेले आहे. विहिरी पासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत ६ KG च्या अखंड काळा पाईप टाकून त्याची प्रेशर मशीन ने टेस्टिंग करायला पाहिजे होती ते तालुक्यातील एकाही कामाची केलेली नाही. नियमानुसार विहिरीचे खोदकाम हे ५० फुट करणे असून व बांधकाम पण ५० फुटाच्या वर करणे आहे परंतु खडकापासूनच वर २० ते २५ फुट बांधकाम केलेले आहे. नियमानुसार भविष्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून विहिरीमध्ये ४ ते ५ आडवे बोर मारणे असून सुद्धा तालुक्यातील एकाही विहिरीला आडवे बोर मारलेले नाहीत. पाण्याच्या टाकी पासून जवळच म्हणजे गावाला लागून विहिरीचे खोदकाम करायला पाहिजे होते. आवश्यकता नसताना ठेकेदाराच्या फायद्यासाठी या कामाची लांबी वाढवलेली आहे. परंतु रायझिंग बिल खोदकाम बिल कामापेक्षा जास्त प्रमाणात दिले आहेत. अंदाजपत्रकानुसार जुन्या विहिरीचे खोलीकरण करणे गरजेचे होते परंतु ते केलेले नाही थातूरमातूर डागडूजी करून काम केले आहेत. प्रत्येक घरा समोर काँक्रीट प्लॅटफॉर्म तयार करून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे नळ लावून देणे आहे परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे प्लास्टिक पाईप चे नळ जोडणी केली आहे.त्यामुळे वरील सर्व जिवती तालुक्यातील नळ योजनेची कामे ही नियमानुसार केलेली नसून ही कामे संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने थातूर- मातुर करून ठेकेदारांनी व संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांनी हात मिळवून केलेली आहे. झालेले एकूण १९ पूर्ण कामाची व अपूर्ण राहिलेले १२५ कामाचे रनिंग बिल काढण्यात आलेली आहेत. म्हणून संबंधित कामाची योग्य चौकशी करण्यात यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ ८ दिवसात मौका चौकशी करावी व मोका चौकशी करते वेळी निवेदन कर्त्याला कळविण्यात यावे व ज्या ग्रामपंचायत अंतर्गत गावात कामे केली आहे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावातील तंटामुक्त समिती या सर्वांच्या समोर कामाची चौकशी करावी व नियमानुसार संबंधित ठेकेदाराकडून ही कामे करून घ्यावी. चौकशी अहवाल संबंधित निवेदन करताना देण्यात यावे. अन्यथा ९ व्या दिवशी सय्यद शब्बीर जागीरदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका जिवती च्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.( *विशेषता शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत मौजा शेणगाव व घनपटार या कामाची विशेष चौकशी करावी*)

जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


जिवती तालुक्यातील जलजीवन मिशनची संपूर्ण कामे निकृष्ट दर्जाची व बोगस झालेली आहेत. संपूर्ण कामाची कसून चौकशी- सय्यद शब्बीर जागीरदार*
 
जिवती:- जिवती तालुका हा दुर्गम असून या तालुक्यात जल जीवन मिशन च्या माध्यमातून संपूर्ण गावात नळ योजनेचे कामे सुरू आहेत हे कामे शासनानी अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेट ) करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. परंतु जिवती तालुक्यातील कोणत्याच गावातील नळ योजनेचे कामे हे नियमानुसार व अंदाजपत्रकानुसार कामे करण्यात आलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात या जन जन मिशनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे व बोगस दर्जाचे कामे करण्यात आली आहे. कामापेक्षा जास्त बिल संबंधित यंत्रणेने अदा केली आहे. जिवती तालुक्यात १४४ कामे मंजूर झाले व सुरू झाले त्या कामामधून आज पर्यंत १९ कामे पूर्ण झाली आहे. व १२५ कामांना निधीमुळे अचानक ब्रेक लागला आणि कामे अपूर्ण राहिली आहे. 
अंदाजपत्रका नुसार ( इस्टिमेट ) प्रत्येक गावात नळ योजने करिता पाईपलाईन ही ३ फुट जमिनीमध्ये खोल टाकायची आहे ती कमी खोदकाम करून पाईपलाईन टाकलेली आहे. व ज्या ठिकाणी वळण डांबरीकरण, सिमेंट रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. त्या ठिकाणी काँक्रीट करायचे आहे ते केलेले नाहीत. म्हणून रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे दररोज अपघात होत आहे.

 रायझिंग करणे खोदकाम करणे खडक असेल तर त्या ठिकाणी ब्लास्टिंग करणे व खोली ३ फूट खोदणे हे अनिवार्य असून सुद्धा परंतु ते खोद काम कमी करण्यात आले आहे.
 विहिरी पासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिंगल ६ KG च्या अखंड काळा पाईप टाकायचे आहे परंतु ते २० फूट चे ४ KG कमी साईज वाले पाईप टाकण्यात आले आहेत. 
 अंदाजपत्रकानुसार विहीर खोदकाम करण्याअगोदर त्या ठिकाणी टेस्टिंग बोरवेल मारून ते पाणी टेस्टिंगसाठी पाठवायचे होते परंतु ते नियमानुसार टेस्टिंगला पाठवलेले नाही त्यामुळे पाण्याची टेस्टिंग नव्याने करण्यात यावी. पाण्याच्या टाकीची डिझाईन ही गावाच्या क्षमतेनुसार गावानुसार वेगवेगळी डिझाईन करायला पाहिजे होती. परंतु तसे केलेले नाही सर्व तालुक्यातील एकच डिझाईन चे बांधकाम केलेले आहे. पाण्याच्या टाकीचे बेस्मिट ( पाया ) हे १६ MM व १२ MM चे लोखंडी राड वापरून करायला पाहिजे होते. परंतु सर्व ठेकेदारांनी १२ MM व १० MM चे लोखंडी राड वापरून बेस्मिट बांधकाम केलेले आहे. विहिरी पासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत ६ KG च्या अखंड काळा पाईप टाकून त्याची प्रेशर मशीन ने टेस्टिंग करायला पाहिजे होती ते तालुक्यातील एकाही कामाची केलेली नाही. नियमानुसार विहिरीचे खोदकाम हे ५० फुट करणे असून व बांधकाम पण ५० फुटाच्या वर करणे आहे परंतु खडकापासूनच वर २० ते २५ फुट बांधकाम केलेले आहे. नियमानुसार भविष्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून विहिरीमध्ये ४ ते ५ आडवे बोर मारणे असून सुद्धा तालुक्यातील एकाही विहिरीला आडवे बोर मारलेले नाहीत. पाण्याच्या टाकी पासून जवळच म्हणजे गावाला लागून विहिरीचे खोदकाम करायला पाहिजे होते. आवश्यकता नसताना ठेकेदाराच्या फायद्यासाठी या कामाची लांबी वाढवलेली आहे. परंतु रायझिंग बिल खोदकाम बिल कामापेक्षा जास्त प्रमाणात दिले आहेत.
 अंदाजपत्रकानुसार जुन्या विहिरीचे खोलीकरण करणे गरजेचे होते परंतु ते केलेले नाही थातूरमातूर डागडूजी करून काम केले आहेत. प्रत्येक घरा समोर काँक्रीट प्लॅटफॉर्म तयार करून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे नळ लावून देणे आहे परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे प्लास्टिक पाईप चे नळ जोडणी केली आहे.
त्यामुळे वरील सर्व जिवती तालुक्यातील नळ योजनेची कामे ही नियमानुसार केलेली नसून ही कामे संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने थातूर- मातुर करून ठेकेदारांनी व संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांनी हात मिळवून केलेली आहे. झालेले एकूण १९ पूर्ण कामाची व अपूर्ण राहिलेले १२५ कामाचे रनिंग बिल काढण्यात आलेली आहेत. म्हणून संबंधित कामाची योग्य चौकशी करण्यात यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ ८ दिवसात मौका चौकशी करावी व मोका चौकशी करते वेळी निवेदन कर्त्याला कळविण्यात यावे व ज्या ग्रामपंचायत अंतर्गत गावात कामे केली आहे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावातील तंटामुक्त समिती या सर्वांच्या समोर कामाची चौकशी करावी व नियमानुसार संबंधित ठेकेदाराकडून ही कामे करून घ्यावी. चौकशी अहवाल संबंधित निवेदन करताना देण्यात यावे. अन्यथा ९ व्या दिवशी सय्यद शब्बीर जागीरदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका जिवती च्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

( *विशेषता शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत मौजा शेणगाव व घनपटार या कामाची विशेष चौकशी करावी*)

Post a Comment

0 Comments