Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

मानव विकास मिशन योजने अंतर्गत सायकल वाटप योजनेची चौकशी करा- हकानी शेख

जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

मानव विकास मिशन योजने अंतर्गत सायकल वाटप योजनेची चौकशी करा- हकानी शेख 

जिवती:-जिवती तालुक्यातील काही माध्यमिक शाळांना मानव विकास मिशन अंतर्गत निधी प्राप्त झाली होती. त्या निधीतून माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या वर्ग ८ ते १२ वी पर्यंत विद्यार्थिनींना सायकल घेऊन द्यायची होती. परंतु तालुक्यातील काही शाळेत सायकल वाटप झाले नसल्याचे संशय निर्माण झाला आहे. कारण हकानी शेख यांनी माहिती अधिकार अर्जातून माहिती मागितली असता.हकानी शेख यांना माहिती मिळाली नसल्याने. प्रथम अपिलीय अर्ज पंचायत समिती जिवती येथे अर्ज दाखल केला. अपिलीय अर्जाची सुनावणी गट विकास अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्या कक्षात झाली. सुनावणीच्या तब्बल पंधरा दिवसानंतर अपूर्ण माहिती अर्जदाराला देण्यात आली. संबंधित अर्जदाराने पूर्ण माहिती बद्दल जन माहिती अधिकारी यांना विचारणा केली असता. जन माहिती अधिकारी यांनी तोंडी उत्तर दिले की काही शाळांनी माहिती दिली नाही. म्हणून आपण पुढची कारवाई करू शकतात असे अर्जदारास सांगितले. मानव विकास मिशन अंतर्गत कार्यक्रम सन २०२४- २०२५ यावर्षी जिवती तालुक्यातील शाळेत सायकल वाटपात भ्रष्टाचार झाला असल्याचे संशय निर्माण झाला आहे म्हणून. ज्या शाळांना मानव विकास अंतर्गत निधी मिळाली आहे. त्या शाळांची चौकशी करण्यात यावी. ज्या शाळांनी सायकल वाटप केली नसेल निधी हडप केली असेल तर आपल्या विभागाकडून चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन .
 जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना हकानी शेख यांनी दिले. चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा हकिनी शेख तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments