जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*पिट्टीगुडा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोमात*
*अवैध धंद्यांमुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण*
*हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी*
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेला आकांक्षित तालुका म्हणून जिवती तालुक्याची हल्ली ओळख झालेली आहे. या तालुक्यातील पिट्टीगुडा पोलिस स्टेशन हद्दीत अनेक बेकायदेशीर व्यवसायाला मिळत आहे चालना? नागरिकांचा आरोप,
अवैध दारू विक्री परिसरातील गाव खेड्यात जोमात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तर सर्रास अवैध दारू विक्री आणि पैशांवर जुगार खेळला जात असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
या अवैध धंद्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असून, काही समाजकंटक यामध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचे दिसून येते. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा कथित आर्थिक ‘चिरीमिरी’मुळेच हा अवैध प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. यामध्ये विशेषतः सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांची मुले आर्थिक आमिषाला बळी पडून या जुगारात ओढली जात असून, अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या परिसरात अवैधरित्या दारू पुरवठा करणारा याच परिसरातला असल्याचे बोलले जात असून असेही आरोप सुशिक्षित नागरिकाकडून होत आहे की. अवैध दारू पुरवठा करणाऱ्याचे व संबंधित पोलिसांचे घनिष्ठ संबंध असल्याचे चर्चेला उदान आले आहे. या परिसरात सुगंधीत तंबाखू, माजा, बागबान, ईगल व अनेक प्रकारचे गुटखा पुरवठा करणारा तो कोण चर्चेला उधाण आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अवैध सुगंधीत तंबाखू , गुटखा विक्री करणाऱ्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाही करण्यात येईल असे संबंधित मंत्र्यांनी सक्त आदेश दिले. मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी होते की लक्ष्मी दर्शनामुळे अंमलबजावणी घोषणाच पुर्ती मर्यादित राहते याकडेही परिसरातील नागरिकांनी लक्ष केंद्रित केले आहे.
या अवैध व्यवसायाचा दुष्परिणाम संपूर्ण परिसरावर होत आहे. या अवैध व्यवसायाकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का? या परिसरातील अवैध धंदे बंद करतील का? संबंधित पोलिसांना जाॅब विचारतील का? किंव्हा अवैध धंदे राजरोसपणे असेच चालतील का? परिसरातील नागरिकांना प्रश्न पडला आहे.



0 Comments