महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
माननीय श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 05 ऑगस्ट 2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून मोठा मारोती मंदिर समोर, जाम ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्र 44 चे सर्व्हिस रोडवर सापळा रचुन आरोपी क्र 1) अंकुश अरुण मेश्राम वय 34 वर्ष रा. महात्मा फुले वार्ड हिंगणघाट, जि. वर्धा याचेवर एन.डी.पि.एस. कायद्याचे तरतुदींचे तंतोतंत पालन करून रेड केला असता, नमुद आरोपी हा त्याचे ताब्यातील विना क्रमांकाच्या हिरो डेस्टीनी मोपेड वरून गांजा अंमली पदार्थांची विक्री करीता वाहतुक करतांना मिळुन आला. आरोपीस गांजा माल खरेदीबाबत विचारपुस केली असता, त्याने सांगितले कि, सदर गांजाचा माल हा त्याचे स्वतःचे मालकिचा असुन, तो त्याने नागपुर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथील सुरज नावाचा ईसमाकडुन खरेदी केल्याचे सांगितल्याने, जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातुन 2.109 किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थ, मोपेड व मोबाईलसह जु.कि. 1,77,180 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. हिंगणघाट यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. उमाकांत राठोड, पो.अं मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



0 Comments