Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

*लिंबे वडगांव दलीत वस्तीचे पुनर्वसन व बोगस लाभार्थी घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन


   

 जालना महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 
                                      जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव येथे पाटोदा साठवण तलावामुळे दलीत वस्ती बाधीत झाली आहे. सदरील दलीत वस्तीचे पुनर्वसन व बोगस लाभार्थी अनुदान घोटाळा प्रकरणी दोषींवर निलंबनाची कार्यवाही करुन शासनाच्या निधीचा उपहार केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्हाधिकारी मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनावर मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके,अँड.अशोक खरात, विजय जाधव, सतीश डोंबे, अचित जाधव, दीपक जाधव, रामा महाजन, गजानन होळकर, सुरेश जाधव ,बाबासाहेब अवचार ,विलास होळकर, बाळासाहेब महाजन ,नवनाथ महाजन, अंकुश होळकर ज्ञानोबा पितळे प्रकाश खानपटे अशोक जाधव प्रभाकर खनपटे ,राजेभाऊ जाधव ,महादेव चव्हाण, दत्ता देवकते, रामेश्वर खनपटे ,नारायण बालटकर ,आश्रुबा जाधव, उद्धव खरात, मनान शेख ,बबन होळकर ,आशामती भुतकर, रामप्रसाद विभुते, विश्वनाथ बालटकर ,श्रीरंग खरात ,मनीषा जाधव, त्रिवेणी होळकर ,बाबाबाई डोंबे, पार्वती होळकर ,आशामती अवचार ,मिरा चव्हाण ,कालींदा पितळे, कविता जाधव, ज्योती जाधव ,नंदा जाधव ,सरस्वती देवकते ,अशामती भुतकर, योगिता खनपटे यांच्या सह शेकडो महिला गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments