Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

राष्ट्रीय महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा; रेल्वे गोल पुलियाखालील रस्ता दुरुस्त करून मुजोर रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करा — वंचित बहुजन आघाडीची मागणी*

चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी हानिशा दुधे 


*राष्ट्रीय महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा; रेल्वे गोल पुलियाखालील रस्ता दुरुस्त करून मुजोर रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करा — वंचित बहुजन आघाडीची मागणी*

बल्लारपूर, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : बल्लारपूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलेल्या खोदकामानंतर रस्त्याची पुनर्बांधणी न होणे, बल्लारपूर पेपर मिलने केलेले कथित अतिक्रमण तसेच रेल्वे गोल पुलियाखालील रस्त्याची दुरवस्था या गंभीर समस्यांबाबत आज वंचित बहुजन आघाडी, बल्लारपूरच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना मा. तहसीलदार, बल्लारपूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या सर्व समस्यांची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
बल्लारपूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग असूनही या रस्त्यावर अद्याप फुटपाथची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले; मात्र त्यानंतर रस्त्याची योग्य पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली रक्कम खर्च न होता पडून असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, बल्लारपूर पेपर मिलने तीन एक्का गेटसमोर राष्ट्रीय महामार्गालगत रेलिंग उभारून नाली व डांबरी रस्त्याच्या भागाव�

Post a Comment

0 Comments