चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ ने टेकामांडवा शाळेचे शिक्षक दिपक गोतावळे सन्मानित*
जिवती, ७-
जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे देण्यात येणारे सन २०२६ चे 'जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार' याचे शिक्षक दिनी वितरण करण्यात आले आहेत. यामध्ये जिवती तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा, केंद्र/बीट टेकामांडवा पं स जिवती येथील विषय शिक्षक श्री. दिपक अर्जुनराव गोतावळे यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. दिपक गोतावळे यांनी टेकामांडवा येथील जिल्हा परिषद शाळेत विषय शिक्षक म्हणून कार्यरत असताना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. विविध शैक्षणिक उपक्रम, डिजिटल शिक्षण पद्धती आणि गुणवतापूर्ण अध्यापन, कोरोना काळात लोकवर्गणीतून शाळेत केलेला कायापालट, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक,SQAAF मूल्यांकनात शाळेला अ+ श्रेणी प्राप्त, स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेत दरवर्षी नेत्र दीपक कामगिरी, शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढ या व अशा अनेक योगदानाची दखल घेऊन त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनाच्या दिवशी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री मा अशोकराव उईके, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, मा पुलकित सिंह सी ई ओ, राजेश पाताळे माध्य शिक्षणाधिकारी,आश्विनी सोनवणे प्राथ शिक्षणाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले।
त्यांच्या या यशामुळे शिक्षण विभागासह संपूर्ण जिवती तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे अधिकारी,कर्मचारी,टेकामांडवा येथील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ,सहकारी,शाळा व्य समिती यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील भावी वाटचालीस आणि शैक्षणिक कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



0 Comments