सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
🔥 कुपवाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकासाठी निर्णायक पाऊल!
‘दहाड’ सामाजिक संघटनेच्या बैठकीत पुतळा समिती स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय; भवन, स्टडी रूम व ग्रंथालय उभारण्याचाही निर्धार
कुपवाड शहरात विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या मागणीला आता संघटित स्वरूप मिळणार आहे. ‘दहाड’ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. सचिन दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा मुख्य कार्यालयात यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत कुपवाड शहरातील विविध भागांतील समाजबांधवांना एकत्रित करून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती’ लवकरच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा, भवन, विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम आणि ग्रंथालय उभारण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.
शिक्षणासाठी ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम आणि महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करणारे भव्य स्मारक उभारण्याचा हा संकल्प समाजाच्या एकजुटीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस माजी नगरसेवक मा. सचिन दादा सावंत, विद्यमान नगरसेविका मा. स्नेहल ताई सावंत, विद्याताई कांबळे, सनी धोत्रे, ॲड. श्रीनाथ कांबळे, आनंद कांबळे, प्रशांत वाघमारे, रतन तोडकर, जितेंद्र कोलप, विवेक तोरवे, विनोद दादा सौदे, निखिल गाडे, दयानंद कांबळे, सुहास धोत्रे, सागर यशवंत सावंत, विशाल बापू कोठावळे तसेच कुपवाड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✊ एकजुटीतून संघर्षाची दिशा; कुपवाडमध्ये बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्धार!



0 Comments