Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शेणगावात धनगर समाजाच्या हक्कांसाठी रणशिंग!धनगर समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीचा हुंकार; शेणगावात अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख


शेणगावात धनगर समाजाच्या हक्कांसाठी रणशिंग!

धनगर समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीचा हुंकार; शेणगावात अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

जिवती : राज्य कमिटीच्या आदेशानुसार अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक दि. १ सप्टेंबर रोजी जिवती तालुक्यातील शेणगाव येथे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तिरुपती पोले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.

बैठकीत धनगर समाजावरील अन्याय-अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये नवीन कार्यकारिणी स्थापन करून संघटन अधिक मजबूत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्य कार्यकारिणीच्या उपस्थितीत लवकरच चंद्रपूर जिल्हास्तरावर भव्य पदाधिकारी नियुक्ती सोहळा व समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

समाजातील युवकांना मोठ्या प्रमाणावर संघटनेशी जोडणे, सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणे आणि धनगर समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

बैठकीस जिल्हाध्यक्ष तिरुपती पोले, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी श्रीरामे, जिल्हा सरचिटणीस बालाजी करले, गोपीनाथ बोरुले, मनोहर पोले, तालुकाध्यक्ष रामेश्वर देवकते, गोविंद गोरे, सुरज शेंडगे, महादेव फुगणार, मालू पोले, खंडेराव सलगर, नवनाथ कोकणारे, साधू सलगर, दयानंद थाडगे, मारुती काचगुंडे, शंकर देवकते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments