Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार, सांगली येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा**सांगली, १५ ऑगस्ट :* बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार, सांगली येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि धम्ममय वातावरणात साजरा करण्यात आला.

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 


*बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार, सांगली येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

*सांगली, १५ ऑगस्ट :* बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार, सांगली येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि धम्ममय वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी ८.३० वाजता विहाराचे माजी खजिनदार *मा. गडवीर* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत संपन्न झाल्यानंतर विहारात महाकारुणिक तथागत *भगवान बुद्ध* तसेच विश्वरत्न *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते धूप, दीप व पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले.

त्यानंतर *मा. गोरखनाथ होणा गडवीर* आणि त्यांच्या सुसंस्कृत पत्नी *सौ. गडवीर* यांचा विहाराचे अध्यक्ष *डॉ. सुधीर जंबू कोलप* यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहाराचे उपाध्यक्ष *मा. जगन्नाथ आठवले* यांनी केले.  
यावेळी विहाराचे संचालक *मा. चंद्रकांत भिवा चौधरी* यांनी भाषणात सांगितले की, "आज १५ ऑगस्ट. आजच्याच दिवशी १९४७ ला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मात्र केवळ राजकीय स्वातंत्र्यच नव्हे, तर सामाजिक स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांचा लढा फक्त इंग्रजांविरुद्ध नव्हता, तर हजारो वर्षांच्या जातीय गुलामगिरीविरुद्ध होता. त्यांनीच आपल्याला संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली." स्त्रीयासाठी प्रसूतीची सहा महिन्याची पगारी रजा, रिझर्व बँकेची स्थापना कामाचे 14 तासा वरून कामाचे आठ तास केले. दोन्ही गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांच्यावर होणारा अन्याय मांडला.

कार्यक्रमात विहारातील उपासक-उपासिकांनी बौद्ध गीते सादर केली. शेवटी सर्वांना गोड जिलेबी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास खालीलप्रमाणे संचालक सदस्य उपस्थित होते,.आयु.सचिन कांबळे,विकास भिसे बोधिसत्व धम्मरत्न आयुष्यमती चेतना नागवंशी उन्नती बोरखडे,राहुल कांबळे,प्रकाश शिवशरण,अजित माने इ.............
.....

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विहाराचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक सदस्य यांनी परिश्रम घेतले.

भवतु सब्ब मंगलं

Post a Comment

0 Comments