Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

बंगाली कॅम्प परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन व भव्य पक्षप्रवेश

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


बंगाली कॅम्प परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन व भव्य पक्षप्रवेश

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौक परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन तसेच भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर अंधेवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात बंगाली कॅम्प परिसरातील अनेक कामगार, युवक व नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये विधी सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अजित भैया पांडे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेशजी वासलवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाऊ कुकरे, जनहित सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश काडवांदे, सुनील गुढे, जनहित सेनेचे तालुका अध्यक्ष राज वर्मा तसेच विधी सेनेचे जिल्हा सचिव ॲड. महेंद्र विश्वरोजवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या विविध जबाबदाऱ्या जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये राकेश हनुमंते – विभाग अध्यक्ष, शुभम लवंगेवार – विभाग उपाध्यक्ष, बंटी कास्तवार – शाखा अध्यक्ष, अभिलाष कास्तवार – शाखा उपाध्यक्ष आणि नंदकिशोर दौडके – विभाग संघटक यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष अमर अंधेवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या भव्य पक्षप्रवेशामुळे बंगाली कॅम्प परिसरात संघटनेची ताकद आणखी मजबूत झाली असून, आगामी काळात कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना अधिक जोमाने कार्य करेल, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी, नवनियुक्त पदाधिकारी, मनसैनिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कामगारांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सदैव मैदानात!”

— अमर अंधेवार
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, चंद्रपूर

Post a Comment

0 Comments