Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ रुग्णवाहिकेच्या टायरची दयनीय अवस्था; तात्काळ बदलाची मागणी*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ रुग्णवाहिकेच्या टायरची दयनीय अवस्था; तात्काळ बदलाची मागणी*


जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शेणगाव येथे कार्यरत असलेल्या १०२ रुग्णवाहिकेच्या चारही टायरची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. टायर मोठ्या प्रमाणात झिजल्याने कोणत्याही क्षणी ते फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रेफर रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा अन्य वैद्यकीय केंद्रात नेताना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिवती तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील अनेक गावांतील नागरिक उपचारासाठी अवलंबून असतात. गंभीर रुग्ण, गर्भवती माता तसेच अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी १०२ रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, या रुग्णवाहिकेच्या टायरची स्थिती चिंताजनक असल्याचा आरोप होत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित आरोग्य प्रशासनाने या रुग्णवाहिकेची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक असल्यास चारही टायर नवीन बसवावेत, तसेच रुग्णवाहिका सुरक्षित स्थितीत असल्याची खात्री करूनच सेवेत ठेवावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या संदर्भात संबंधित आरोग्य विभागाकडून अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण प्राप्त झालेले नाही. प्रशासनाने या बाबीची त्वरित दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments