Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

बीट मदतनीसांविना वनरक्षकांचे हाल; *जीव धोक्यात घालून जंगल संरक्षण, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 


*बीट मदतनीसांविना वनरक्षकांचे हाल; 
*जीव धोक्यात घालून जंगल संरक्षण, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*


 शेकडो हेक्टर वनक्षेत्रातील जल,जंगल,जमीन चे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या वनरक्षकांना मागील काही वर्षांपासून बिट मदतनीस बंद केल्यामुळे वनरक्षकांना वनसरक्षण करताना अनेक अडचणींना समोर जावे लागत असून वनसरक्षण रामभरोसे झाले आहे

    पावसाळ्याची चाहूल लागताच जंगलात गवत, झुडपे आणि विविध तण प्रजाती मोठ्या प्रमाणात वाढतात. याच काळात साप, विंचू, रानडुक्कर, बिबट्या, अस्वल यांसारख्या वन्य प्राण्यांचा वावरही वाढतो. अशा धोकादायक परिस्थितीत जंगलाचे संरक्षण, गस्त, अवैध वृक्षतोड रोखणे, वन्यजीवांचे संवर्धन आणि विविध शासकीय कामांची जबाबदारी एकट्या वनरक्षकांवर सोपविली जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

     वनरक्षकांचे म्हणणे आहे की, प्रत्येक बीटमध्ये किमान एक बीट मदतनीस असणे अत्यावश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी मदतनीस उपलब्ध करून दिले जात नसल्याने वनरक्षकांना जीव धोक्यात घालून एकट्यानेच जंगलात काम करावे लागत आहे. दाट गवतामधून गस्त घालताना कोणत्याही क्षणी विषारी साप, विंचू किंवा इतर वन्य प्राण्यांचा सामना होण्याची भीती कायम असते.

दरम्यान, वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष जंगलातील परिस्थिती, वनरक्षकांच्या अडचणी आणि मनुष्यबळाच्या कमतरतेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. या आरोपांमुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी होत आहे.

वनरक्षक हे जंगल आणि वन्यजीव संरक्षणाच्या पहिल्या रांगेतील कर्मचारी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक मनुष्यबळ, संरक्षण साहित्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. केवळ कार्यालयातून आदेश देऊन जंगलाचे संरक्षण शक्य नसून, प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्षम करणे ही काळाची गरज असल्याचे मत वन कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments