Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

गडचांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिर; २१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*गडचांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिर; २१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग* 

चंद्रपुर / गडचांदूर:-
समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत गडचांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक व रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण २१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या समाजोपयोगी उपक्रमात सहभाग नोंदविला.
या रक्तदान शिबिराला गडचांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री. गोदे साहेब तसेच कोरपना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक (PI) सौ. वाडवे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक तथा श्रमिक कामगार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. अभिमन्यू चव्हाण (पाटील) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी रुग्णसेवक मुकिंद चव्हाण, सोपान जाधव, श्रीदास राठोड तसेच गडचांदूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाचा संकल्प करावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. रक्तदाते, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मान्यवरांनी आभार मानले. रक्तदानासारख्या समाजहिताच्या उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments