Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

टेकामांडवा पोलीस स्टेशन हद्दीतील हिमायतनगर येथे अवैध दारूचा महापूर?*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*टेकामांडवा पोलीस स्टेशन हद्दीतील हिमायतनगर येथे अवैध दारूचा महापूर?*

*प्रवासी निवाऱ्यात बेवड्यांचा धुमाकूळ; नागरिकांचा संताप*

*हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी*
 
जिवती:- जिवती तालुक्यातील टेकामांडवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिमायतनगर गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. गावातील प्रवासी निवाऱ्यात काही व्यक्ती खुलेआम दारू पित असल्याने तेथे रिकाम्या दारूच्या बाटल्या व कचऱ्याचा खच साचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे गावातील प्रवासी निवाऱ्याची स्वच्छता आणि सार्वजनिक शिस्त धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. संतप्त युवकांनी पुढाकार घेऊन प्रवासी निवारा स्वच्छ केला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुकवर, अपलोड करण्यात आला आहे. या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, "अवैध दारू विक्रीकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत का?" तसेच "हप्ते घेऊन अवैध दारू विक्रीला संरक्षण दिले जात आहे का?" असे गंभीर आरोप काही नागरिकांकडून करण्यात आले आहेत. दारुमुळे गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई करावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments