सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
*बहुजन संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून २९ जुलै रोजी मनपा कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन*
बहुजन संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मुख्य (जिल्हा) कार्यालयासमोर "मनपाच्या दुहेरी भूमिकेविरोधात" निदर्शन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उमरफारूक काकमरी यांनी दिली.
नुकतीच महानगरपालिकेने मिरज परिसरात हातगाडेधारक, फेरीवाले व रस्त्यालगत छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमणाची कारवाई केली आहे. त्यामुळे लहान व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई आणि मोठ्या कथित अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या आंदोलनातून बहुजन संघर्ष सेना खालील प्रमुख मागण्या करणार आहे :
प्रभावशाली व्यक्तींच्या कथित अतिक्रमणांची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी.
कायद्याची अंमलबजावणी सर्वांवर समान पद्धतीने करावी.
कोणताही भेदभाव न करता सर्व अतिक्रमणांवर समान निकषाने कारवाई करावी.
नागरिकांसमोर कारवाईचा अहवाल सार्वजनिक करावा.
संघटनेने स्पष्ट केले आहे की हे आंदोलन संविधानिक आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समान न्यायाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– बहुजन संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्य



0 Comments