चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*मुंबईत चंद्रपूरचा डंका! अभिमन्यू चव्हाण (पाटील) यांना 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान' पुरस्कार*
रक्तदान, समाजसेवा आणि जनकल्याणातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल..
हाकानी शेख- चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
जिवती,२९- मुंबई येथे
अरिहंताणं रक्त सारथी संस्थानच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिमन्यू चव्हाण (पाटील) यांना 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार – २०२६' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
रक्तदान जनजागृती, मानवसेवा, सामाजिक कार्य आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
हा पुरस्कार कॅप्टन डॉ. सुरेशजी सैनी (हरियाणा) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अरिहंताणं रक्त सारथी संस्थेचे संस्थापक श्री. कैलासजी जैन, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री कु. पियू चव्हाण, अभयकुमार तेलतुंबडे (श्रीरामपूर), माधव सुवर्णकार (नांदेड), अभी बेले (पांढरकवडा), श्रीकृष्ण कुमार (मुर्तीजापूर) तसेच देशातील विविध राज्यांतून आलेले सामाजिक कार्यकर्ते, रक्तदाते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात अभिमन्यू चव्हाण यांच्या रक्तदान चळवळीतील सक्रिय सहभाग, समाजसेवा आणि जनहिताच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी संस्थेचे आभार मानत, समाजहित आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले.
या राज्यस्तरीय सन्मानामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध स्तरांतून अभिमन्यू चव्हाण (पाटील) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



0 Comments