Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

उपविभागीय अधिकारी दालनात विष प्रशन केलेले आदिवासी उपचारानंतर गावाला पोहचले ........ [ १५ दिवसात निर्णय न झाल्यास कुटूंबासह कंपनीच्या मुख्य गेटवर आत्मदहन करण्याचा निर्धार

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

उपविभागीय अधिकारी दालनात विष प्रशन केलेले आदिवासी उपचारानंतर गावाला पोहचले ........ [ १५ दिवसात निर्णय न झाल्यास कुटूंबासह कंपनीच्या मुख्य गेटवर आत्मदहन करण्याचा निर्धार 
 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा येथील उपविभागीय कार्यालयामध्ये दिनांक 13 एप्रिल 2026 ला माणिकगड सिमेंट कंपनीच्या अन्यायाला त्रस्त व प्रशासनाच्या लाल फीतशाही मुळे गेल्या पंधरा वर्षापासून संघर्ष अत्याचार होत असताना प्रशासन विशेषता राजुरा येथील उपविभागीय अधिकारी रवींद्र माने भूमी अभिलेख विभाग व वन विभागाच्या दिशाभूल करणाऱ्या अहवालामुळे मोजणी झालेल्या जमिनीचा ताबा देण्यासाठी झालेल्या दुर्लक्षामुळे अन्याय असाह्य झाल्याने आदिवासी कोलाम यांनी थेट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन विषारी औषध प्राशन करून संपूर्ण राज्यात खळबळ वाजवून दिली मात्र ते त्रस्त झाले त्यांचे कुटुंबच रस्ते झाले 19 महिन्यापर्यंत माईन्स क्षेत्रातील शंकर मंदिराजवळ ठिया आंदोलन मानून त्याच ठिकाणी ऊन पाऊस थंडी याच्या झडा घेत अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाने साधी विचारपूस सुद्धा केली नाही यामुळे प्रशासन मुजोरीने कंपनीला मदत करत असल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली चुकीचा अहवाल देऊन वनविभाग उपसरंक्षक श्वेता बोडू भूमी अभिलेख निरीक्षक राजुरा यांनी मोघम अहवाल देऊन वाद निर्माण केल्याने अधिवाशांमध्ये चीड निर्माण झाली होती 2007 मध्ये कंपनीने आमच्या जमिनीवर ताबा केला अशी लेखी तक्रार उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे असून त्याची पोच त्या आदिवासीकडे आहे असे असताना अधिकाऱ्यांनी दिशा भुल करण्याचा अहवाल देऊन दुधात मिठ घालून जमीन वाद चिघडला रुग्णालयात जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ अशोक उईके यांनी दि १४ ला भेट देऊन समज घातली व उपचार चांगला करा व उपचारानंतर शासकीय वाहनाने घरी पोहचवा असे निर्देश दिले मात्र वाहन भेटले नाही आपल्या सोयीने रात्रौ ला घरी पोहचले मात्र भावना तिव्र होत्या आमच्यावर पोलासानी १० - १२ गुन्हे दाखल केले मात्र आमच्या शेकडो तकारी पोलीस / महसुल अधिकारी कडे धुळ खात पडले यामुळे कंपनीच्या मुजोरीत भर पडून विषय घेण्याची पाळी आमच्या वर ओढावली जमीन रस्ता रोजगार शोषण करणाऱ्या अनेक घटना घडल्या मात्र कंपनी व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली नाही निवड आश्वासन व बैठका घेऊन कोनताच निर्णय शासन प्रशासनाकडून झाला नसल्याने जोखमीचा निर्णय घ्यावा लागला जमीन गेली रोजगार गेला यामुळे आमच्या दोन पिढ्या बरबाद झाले शासनाने १५ दिवसात ठोस निर्णय घेऊन न्याय द्यावा कोसंबी नोकारी बाम्बेझरी शिवारातील सर्व जमीनीचे भुमापन मोजणी करण्यात यावे कंपनीने क्षेत्रात नसताना २१ हेक्टर जमीन आपसी समझौता करार प्रकरणाची चौकशी करावी नोकारी लिंगणडोह रस्त्यावरील गेट काढून जनते साठी खुले करण्यात यावे ज्या जमीन धारकाच्या जमीन घेतल्या त्यांना कायम नोकरी देण्यत यावी १९ शेतकऱ्याचा वाद जमीन मोबादला किवा ७ / १२ प्रमाणे जमीन ताब्यात देण्यात यावी पोलीसा कडे प्रलंबित तक्रारी व उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय तात्काळ देऊन दोषी अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाव अनुजमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा कुटूंबासह मानिकगड सिमेंट कंपनी मुख्य गेटवर आत्मदहन करण्यात येईल आम्हाला प्रशासन व कंपनीचा जुल्मी अत्याचार सहन करणे शक्य नाही कुटूंब उघड्यावर पडले मुले बेरोजगार झाले जिवन जगणे कठीण झाले शासनाचे तातडीने प्रश्न मार्गी लावावा व कंपनीवर कार्यवाही करावी अशी मागणी जंगु पेंदोर बालाजी सिडाम मारोती तलांडे लचु आत्राम जैराम कुडमेथे यांनी जिल्हा रुग्णालयातून उपचार होऊन बाहेर जाताना कार्यवाही करावी अन्यथा आत्मदहन कुदूंबासह करण्याचा निर्धार करीत भावना व्यक्त केली आहे बघु प्रशासन काय भुमीका घेते

Post a Comment

0 Comments