Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

खडकी हिरापूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा अन्यथा आत्मदहन करणार- आरिफ भाई डोंगरे

जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

खडकी हिरापूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा अन्यथा आत्मदहन करणार- आरिफ भाई डोंगरे

हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी

जिवती:-जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खडकी हिरापूर ग्रामपंचायतीच्या मन मर्जी, हुकूमशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात आरिफ शेख डोंगरे यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी जिवती यांना निवेदन दिले. खडकी हिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत मौजा डोंगरगाव येथे सन २०२४-२०२५ यावर्षी सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर झालेला असून. सुद्धा सदर कामाला सरपंच व सचिव व इतर चार सदस्य यांनी संगणमत करून दिनांक १६/०५/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेच्या विषय सूची मध्ये जन सुविधेच्या कामाचे स्थळ बदलण्याचे विषय नसताना व स्थळ बदलण्याचे कारण नसताना सुद्धा सरपंच व सचिव यांनी आपल्या मर्जीने स्थळ बदलण्याचे ठरव घेतले आहे. सदर ठराव हे सरपंच यांनी हेतू परस्पर आम्हा डोंगरगाव वासियांना व मी एक विशिष्ट वर्ग अल्पसंख्याक समुदायाचे व्यक्ती असल्यामुळे माझ्या घरापासून होणाऱ्या रस्त्याचे काम हे स्थळ बदलून सरपंच हे आपल्या गावात टाटाकोहाळ येथे करण्याचे ठरविले आहे. रस्त्याच्या कामाचे स्थळ बदलण्यात येऊ नये म्हणून ग्रामपंचायत चे उपसरपंच व चार सदस्यांनी दि. ०८/०७/२०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व ग्रामपंचायत खडकी हिरापूर येथे निवेदन दिले होते. तरीपण सदर निवेदनाची कसल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही.व बोगस ठराव घेऊन सदर कामाचे स्थळ बदलण्यात आले. 
निवेदनात मागणी करण्यात आली की जन सुविधा योजने अंतर्गत कामाचे स्थळ बदलण्यात आले ते स्थळ जसं होतं तसं करण्यात यावे. दि.०९/१०/२०२४ रोजी मासिक सभेमध्ये डोंगरगाव येथे सदर रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती व या कामाची निविदा ग्रामपंचायत ने मागविले होते. पेसा अंतर्गत बाला पेंटिंग करण्यात आले असे दाखवून ११६७४२ इतकी रक्कम हडप करण्यात आली. सदर काम झालेला नाही. उचललेली रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा करण्यात यावी सदर सरपंच व सचिवावर गुन्हा दाखल करण्यात यावा. टाटाकोहाळ येथे सुरू असलेले जन सुविधा योजनेचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम तात्काळ बंद करावे अन्यथा दि.२५/०२/२०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून आरिफ शेख डोंगरे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक आघाडी यांच्या वतीने देण्यात आला. याविषयी जबाबदार खडकी हिरापूर ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव व इतर चार सदस्य असणार असा निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदन देताना विजय गोतावळे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरिफ भाई डोंगरे तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सय्यद शब्बीर जागीरदार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments