जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
अल्ट्राटेक कुसुंबी माईन्स नियमबाह्य ब्लास्टिंग घरे उध्वस्त करून डोजर फिरवण्याचा प्रयत्न ?
माणिकगड डोंगर पायथ्याशी निसर्गात नटलेल्या कुसुंबी येथील निवासी वास्तव्य असलेल्या कोलाम आदिवासींचे घराच्या शंभर फूट अंतरावर प्लॅस्टिकचे ड्रिलिंग करून स्फोटक द्रव वापर करूनदगड फोडण्याचे काम कंपनीने गेल्या दोन-तीन दिवसापासून मजुरी ने सुरु केले असून त्या ठिकाणी वास्तव्य असलेल्या घरावर बुल डोजर फिरवण्याचा प्रतापआदिवासी कोलाम नी हाणून पाडला या ठिकाणी शेतीच्या कामावर माणसं गेल्यानंतर दोन-चार म्हातारे असताना कंपनीच्या व्यवस्थापनाने सुरक्षा गार्ड त्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणचे झोपड्या पाळून टाकण्याचा प्रताप आज सकाळी केला गेल्या दोन-तीन दिवसापासून ब्लास्टिंग करून आदिवासीच्या जीवाशी खेळ मांडण्याचा प्रताप माणिकगड सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाने हाती घेतला काय वास्तविकता या गावठाणाचा वाद व जमीन मोबदल्या चा प्रश्न गेल्या पंधरा सोळा वर्षापासून सुरू असून आदिवासींच्या संघर्षाला तोंड दाबण्याचा प्रकार माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापनाकडून केल्या जात आहे हे आदिवासींच्या जमिनी लुटून अधिवाशांना बेघर करण्याचं पाप कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाच्या डोळे झाकमुळे अविरत सुरू आहे आ
6 / 8 /2018 ला मोक्का स्थळी तत्कालीन उपविभागीय महसूल अधिकारी ठुबे मॅडम तहसीलदार बेडसे पाटील मंडळ अधिकारी तलाठी तसेच पोलीस निरीक्षक कोंडावार यांच्या समक्ष पाहणी करून त्या ठिकाणी असलेल्या 84 कुटुंबाच्या बांधण्यात आलेल्या घरे झोपड्या व वास्तव्य असल्याचे पंचनामा करून त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाची माहिती उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती येथील तणावाची स्थिती लक्षात घेता माणिकगड सिमेंट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पिटीशन क्रमांक 47 32 / 2018 उत्तरवादी आबीद अली शंकर आत्राम व इतर एक यांच्याकडून रिप्लाय दाखल करण्यात आला मात्र गेल्या आठ वर्षापासून प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना व न्यायालयाचे कोणतेही आदेश झाले नसताना न्यायालयाचा अवमान करून कंपनी व्यवस्थापनाने बळजबरीने झोपड्या उध्वस्त करण्यासाठी बळाचा व बुलडोजरचा वापर करून अधिवाशांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे याबाबत न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना बनावटी कागद सादर करून आम्हाला आदेश प्राप्त झाला आहे असे सांगून आदिवासींची गोची करण्याचं काम कंपनी व्यवस्थापन करीत आहे कंपनीचे अनेक कारणे सध्या कोरपणा तालुक्यात चर्चेत असून अख्या गडचांदूर शहराचे आरोग्य धोक्यात आले असताना गोपालपूर येथील शेतकऱ्यांनी दोन मार्च 2025 ला जिल्हाधिकारी पर्यावरण विभाग तहसीलदार यांना 25 ते 40 शेतकऱ्यांचे उभे पीक उध्वस्त झाल्याचे व कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले होते मात्र असताना सुद्धा अजून पर्यंत कृषी विभागाकडून चौकशी करून अहवाल महसूल विभागाकडे सादर झाला नाही परिणामता थुट्रा गोपालपूर येथील शेतकऱ्यांची जमिनीची सुपीकता नष्ट होऊन सिमेंटचा डस्ट जमिनीवर थर जमा झाले आहे तर दुसरीकडे पेरणी केलेले बियाणे उगवत नाही उगवले तर त्याला फळ लागत नाही अशी अवस्था आदिवासी शेतकऱ्यांची झाली आहे तर गोपाळपूर या गावात अख्या घरावर सिमेंटच्या धुडीचे थर साचले असून डस्टमुळे सौर ऊर्जेचे पाणीपुरवठा यंत्रणा सुद्धा ठप्प पडली आहे कंपनी आदिवासींच्या जीवावर कुठली असून अनेक संकटांना सामना करण्याची पाळी आदिवासी कुटुंबावर आली आहे कुसुंबी प्रकरणात न्यायालयाचे कोणताही निर्णय झाला नसताना प्लॅस्टिक करण्याची धडपड व आदिवासी कुटुंबांच्या घरावर दगडाचा पाऊस पाडण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असून कंपनीच्या मुजोरीला आवर घालण्यात यावा तसेच ब्लास्टिंग करण्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कोणत्या प्रशासन सक्षम अधिकाऱ्यांनी मान्यता दिली व त्या ठिकाणी न्यायालयाचे अवमान करण्याचा अधिकार माणिकगड सिमेंट कंपनीला केव्हा मिळाला याबाबत तातडीने चौकशी करून कारवाईसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार यांना निवेदन पाठवून तातडीने वादग्रस्त जागेवरील झोपड्या हटवण्याची कारवाई व कंपनीची अनाधिकृत ब्लास्टिंग थांबवण्यात यावी अशी मागणी आदिवासी कुटुंबाने केली आहे



0 Comments