जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*जन माहिती अधिकारी यांने दाखवीला प्रथम अपिलीय अधिकारी च्या आदेशाला केराची टोपली*
जिवती:-तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिवती या कार्यालयाच्या संबंधित येणाऱ्या जिवती तालुक्यातील माहिती सय्यद शब्बीर जागीरदार सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार यांनी माहिती अधिकार नियम २००५ अन्वये अर्ज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिवती या कार्यालयात एकूण ९ मुद्द्यावर माहिती मागितली. माहिती ३० दिवसाच्या आत देणे बंधनकारक असून संबंधित अर्जदाराला माहिती मिळाली नसल्यामुळे. संबंधित अर्जदाराने प्रथम अपीलीय अर्ज दि.२७ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रथम अपिलीय अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिवती यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला. प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक २:३० संबंधित कार्यालयात ठेवण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सय्यद शब्बीर जागीरदार न चुकता सुनावणी तारखेला हजर झाले. प्रथम अपिलीय अधिकारी यांनी जन माहिती अधिकारी यांना ८ दिवसाच्या आत संबंधित अर्जदारास विनामूल्य माहिती देण्यात यावी असे आदेश देण्यात आले. मात्र, १३ दिवस लोटून सुद्धा जन माहिती अधिकारी यांनी संबंधित अर्जदाराला माहिती दिली नाही. संबंधित अर्जदाराने जे माहिती मागितली ती माहिती देण्यात टाळाटाळ होत असेल तर याचा अर्थ खूप मोठा भ्रष्टाचार झाला. असे संशय घेणे योग्यच असणार? प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या व अर्जदाराला मानसिक त्रास देणाऱ्या जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी यांच्यावर माहिती अधिकार अधिनियमनुसार कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सय्यद शब्बीर जागीरदार यांनी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे.



0 Comments