महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
डाॅ.ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ निर्मीत "इनोसंट"नाटकाचा प्रयोग यशस्वी
उत्कंठा वाढविणारे नाटक 'इनोसंट'
तंत्रज्ञानाचा मानवाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. तंत्रज्ञानामुळे जग हे ग्लोबल विलेज झाले आहे. हजारो किलोमिटर वरील माणूसही आपल्याशी सहज संवाद साधतो आहे. सोशल मिडीयाच्या वापरामुळे आपला सर्व डेटा परकीय व्यक्तींच्या हाती गेला आहे. गुपीत असे काही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे जगात सर्वत्र सायबर क्राईम फोफावला आहे. शेकडो ट्रीलियन डॉलरला सायबर क्रायबरनी लोकांना गंडा घातला आहे. कित्येक लोक प्राणासमुकले आहेत. जी ही व्यक्ती ह्या सायबर क्रायमरची शिकार होते ती प्रत्येकक्षण प्रचंड दडपणाखाली जगत असते. सायबर क्रायमरची इतकी दहशत असते की दहशती पोटी आजपर्यंत शेकडो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. महिन्या चार महिन्यात ते नवनवीन फंडे वापरत असतात. अशाच घटनांची एक मालिका ' इनोसंट ' हया नाटकात बघायला मिळते. रविवार दि. ५ आक्टोंबर २०२५ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिरात इनोसंट ह्या नाटकाचा प्रयोग रंगला. हे नाटक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवित पुढे सरकत होते. पुढे काय होणार ? या मागचा सूत्रधार कोण ? सायबर क्राइमच्या जाळ्यात अडकलेले लोक त्यातून कसे बाहेर पडणार ? एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत राहतात. डॉ. डी. वाय. एस. सकपाळ फाउंडेशनने दुर्वा एडुटेंमेंट प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून हे नाटक रंगमंचावर आणले आहे. अशोक हंडोरे हे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत. यातील सर्वच कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना यथोचित न्याय दिला आहे. नाटक रंगमंचावर आणण्याचा उद्देश लोकांना सायबर क्रायमर पासून सावध करणे, सजग करणे त्यांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी करमणूकीच्या माध्यमातून जाग्रृती करणे हे ही आहे. उत्कृष्ट मनोरंजनासोबतच सायबर क्राइमची माहिती जाणून घेण्यासाठी व त्यांच्या पासून बचाव कसा करावा यासाठी ह्या नाटकाचा प्रयोग सहकुटुंब आवश्य बघायला हवा. प्रयोग संपल्या नंतर नाटकाची टीम सायबर क्राईम बद्दल प्रेक्षकांना माहिती देखील पुरविते.
लेखक / दिग्दर्शक/ नेपथ्य/संगीत : अशोक हंडोरे यांनी केले असून
निर्माता : डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ आहेत तसेच
निर्मिती संस्था दुर्वा एडुटेंमेंट
प्रस्तुत : डॉ. डी. वाय. एस.फाउंडेशन असुन प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला



0 Comments