हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी
जिवती:-जिवती तालुक्यात एक ना अनेक गावात अवैध दारूच्या महापूर आलेला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, भारतीय समाजाचा आरसा असून कुठेही अन्याय अत्याचार भ्रष्टाचार व ज्या अवैध धंद्यामुळे भारतीय समाजाची मोठी हानी होत असेल तर त्याबद्दल पत्रकार हा आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार व अवैध धंद्याच्या विरोधात निडरता पणे वाचा फोडण्याचे धाडस दाखवून बातमी प्रकाशित करतो त्या बातमीच्या माध्यमातून जनतेच्या होणारा नुकसान, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार व अवैध धंद्यांना थांबवण्याचे काम सतत आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत राहतो हे वास्तव आहे.
"'' जिवती तालुक्यात चहाचा अगोदर दारूच्या घोट, गांजाचा दम! प्रशासनाचे दुर्लक्ष युवा पिढी व्यसनाच्या दरीत, या मथळया खाली दि.३१ ऑगस्ट रोजी काही पोर्टलवर बातमी प्रकाशित करण्यात आली होती."'" हि बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला! जिवती तालुक्यात अवैध दारू पुरवठा करणारा( बी.पी ) नावाचा दारू माफियाच्या मोबाईल द्वारे सल्ला देण्यात आला होता की तुम्ही जिवती तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्या बद्दल बातम्या छापू नका! अवैध दारू विक्रेते हे गरीब असून यांना जगू द्या! तुम्ही अवैध दारू व इतर अवैध धंद्याबद्दल बातम्या छापत असल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांवर उपास पाळीची वेळ आली आहे.यामुळे तुमची समाजामध्ये जनतेमध्ये बदनामी होत आहे, तुम्हाला जनतेने चांगले बोलावे म्हणून माझी तुम्हाला सल्ला आहे! पत्रकाराला सल्ला होती का? किंव्हा सलल्याच्या माध्यमातून उघड धमकी होती हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे. हा निच अवैध दारू पुरवठा करणारा ! पत्रकाराला सल्ला देण्याच्या लायकीच्या नसून याची विचारधारा किती खालच्या पातळीची आहे हे त्याच्या बोलण्यावरूनच सिध्द होते, ज्या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. युवा पिढी बरबाद होत चालली आहे. या दारूच्या व्यसनामुळे तरुणांना तरुण वयातच हा जग सोडून जावे लागत आहे. बापाची अस्थी पोराच्या खांद्यावर असायला हवी परंतु बापाच्या खांद्यावर पोराची अस्थी जात आहे. युवा पिढी या व्यसनेमुळे बेरोजगार झाला आहे. रोजगाराकडे शिक्षणाकडे त्याच्या दुर्लक्ष झाल्यामुळे. काही युवा पिढी या दारूच्या व्यसनामुळे गांजाच्या व्यसनामुळे चोरी सारख्या व अनेक वाईट मार्ग स्वीकारत आहे. याकडे या दारू-माफीयाचा बघण्याच्या दृष्टिकोन स्वतःसाठी चांगला दिसत आहे. लोकांच्या संसार उध्वस्त व्हावे युवा पिढी बरबाद व्हावी हाच एकमेव हेतू ( बी.पी ) नावाच्या दारुमाफ्याची असल्याची खात्री स्वतः करून दिली आहे. हा ( बी.पी नावाचा) दारू माफिया जिवती शहरात बसून संपूर्ण जिवती तालुक्यात अवैध दारूचा पुरवठा करतो याचे संबंध खालतून वर्तपर्यंत संबंधित प्रशासनासोबत असल्याचे तालुक्यात चर्चा आहे. त्याचे कारण पण तोच दारू माफिया हाय की तो सांगतो की मी खालतून वरपर्यंत हप्ता देतो म्हणून मी इतक्या दिवसापासून तालुक्यात अवैध दारू पुरवठा करतो मला काहीच फरक पडत नाही अशी पण चर्चा तालुक्यातील जनतेकडून ऐकायला मिळत आहे.



0 Comments