Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

फरार खुनाचा आरोपी ला बल्लारपूर पोलिसांनी जेरबंद केले

फरार खुनाचा आरोपी ला बल्लारपूर पोलिसांनी जेरबंद केले 

 
हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी 

चंद्रपूर:- दिनांक १६/०२/२०२४ रोजी फिर्यादी नामे सौ ज्योती बालचंद्र कांबळे वय ३४ वर्षे रा. झाकिर हुसेन वार्ड, बल्लारपुर जि चंद्रपुर यांनी पोस्टे ला येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, दिनांक २४/०२/२०२१ रोजी पोस्टे बल्लारपुर येथे नमुद गुन्हयातील आरोपी नामे सिनु दहागांवकर रा महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपुर यास मृतक नामे कु अनामिका उर्फ रक्षा बालचंद्र कांबळे वय १९ वर्ष हिचे दिलेल्या तकारीवरून आरोपीस जेल मध्ये पाठविले होते. या गोष्टीचा राग मनात धरून मृतक नामे अनामिका उर्फ रक्षा कांबळे हिला आरोपीने आपले राहते घरात बोलावुन तिचा डोक्यात कोणत्यातरी अवजड साधानाने मारून तिचा खुन केला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टें अप क १९४/२४ कलम ३०२ भा द वी चा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आले व वेगवेगळी टिम तयार करून आरोपीचा शोध घेण्यात आला परंतु मिळुन आला नाही. घटनेपासुन आजपावेतो आरोपीचा शोध घेण्यात येत होता. आरोपी वेळोवेळी इतर राज्य बदलुन आपले अस्तित्व लपवुन राहत होता. परंतु पोलीसांनी त्यांचा पाठलाग करणे बंद केलेले नव्हते.

नवनियुक्त प्रभारी अधिकारी मा. बिपीन इंगळे साहेब पोस्टे बल्लारपुर यांनी पोस्टे बल्लारपुर चा पदभार स्विकारताच त्यांनी डि. बी. पथक प्रमुख सपोनि मदन दिवटे व सपोनी शब्बीर पठाण साहेब यांना नमुद खुनाच्या गुन्हयात फरार आरोपी नामे श्रिनिवास उर्फ सिनु उर्फ आकाश लक्ष्मण दहागांवकर रा महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपुर यांचा शोध घेण्यास सुचवुन व योग्य मार्गदर्शन करून आरोपीस लवकरात लवकर त्यांचा शोध घेवुन अटक करण्याचे सुचना दिली, त्यावरून डि बी पथक मध्ये कामकरणारे अमंलदार यांनी आरोपीचा भौतिक व तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून आरोचीवा अचुक ठिकाण शोधुन व आज रोजी आरोपी हा आपल्या नातेवाईक यांना भेटण्याकरिता येणार असल्याची खात्रिशिर माहिती वरून डि बी पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात सपोनि शब्बीर पठान साहेब यांनी त्यास अटक करून मा न्यायलयात हजर केले असता दि ०८/०९/२०२५ पर्यंत आरोपी पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक डॉ मुमक्का सुंदर्शन सा, मा. ईश्वर कातकडे सा, अपर पोलीस अधिक्षक सा, मा उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुधिर नंदनवार सा, राजुरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्री बिपिन एस इंगळे, सपोनि मदन दिवटे, शब्बीर खान पठान सा. पोस्टॉप सप्फौ रणविजय ठाकुर, आनंद परचाके पो हवा संतोष पंडित, सुमिल कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, भास्कर विचवलकर नापोअं सविन अल्लेवार, पोअं शरदचंद्र कारूष, खंडेराव माने, सचिन राठोड, मिलिंद आत्राम, लखन चव्हाण, मपोअं शालिनी नैताम पोस्टे बल्लारशा यांनी केली. 

(

Post a Comment

0 Comments