Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

उपजिल्हाधिकारी यांना पडतात स्वप्न; कार्यालयात पत्र येण्या अगोदरच आदेश तयार

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

“उपजिल्हाधिकारी यांना स्वप्न पडतात म्हणे!”
माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत प्रशासनाचा आदेश वाचून नागरिक अवाक झाले आहेत. ईश्वर महादेव घाळी यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना 24 सप्टेंबर 2025 रोजी ई-मेल पाठवला, पण त्याआधीच 19 सप्टेंबर 2025 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय बाबुराव तेली यांनी आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
 ई-मेल निघण्याआधीच आदेश तयार झाला… म्हणजे काय?
यावर नागरिकांचा एकच सवाल – “उपजिल्हाधिकारी यांना स्वप्न पडतात म्हणे!”
आजवर शासनादेश, पत्रव्यवहार, अर्ज यावर कारवाई होत असे. पण आता अधिकारी थेट “स्वप्नात” अर्ज पाहतात आणि आदेश काढतात, असे दिसून येत आहे.
जर प्रशासन “स्वप्नसृष्टी”वर चालणार असेल, तर पुढे नागरिकांनी अर्ज, पत्रव्यवहार करण्याऐवजी थेट झोपेतच उपजिल्हाधिकारी यांना विनंती करावी लागणार का?
असा प्रश्न ईश्वर चाळी यांनी उपस्थित केला

Post a Comment

0 Comments