Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जि.प.उच्च प्राथमिक शाळा पुनागुडा येथे मोठ्या थाटा माटात स्वातंत्र्य दिवस साजरा व स्पर्धेचे आयोजन

संपादक राहुल मसुरे
महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 
१५ आगष्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासुन दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिवस म्हणुन देशभर साजरा करत असतो १५ आगष्ट हा दिवस आपल्या देशात खुप महत्वाचा सण मानल्या जातो व तो गावापासून शहरात पर्यंत प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा करत असतो.
दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुनागुडा येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आकाशातुन *मुसळधार* पाऊस सुरु असताना सुद्धा लहान लहान मुलांनी व शिक्षकांनी प्रभात फेरी ते झेंडा वंदन करण्यास कसल्यास प्रकारची निष्काळजी व अपरा तर न करता संपुर्ण कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक *निकोडे सर (मुख्याध्यापक)* यांनी केले. ध्वजारोहण *लक्ष्मण गायकवाड अध्यक्ष* शाळा व्यवस्थापन समिती पुणागुडा यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान *श्रीमती रसिकाताई जोंधळे सरपंच* पुणागुडा यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे सर्व सदस्यगण शाळा व्यवस्थापन समिती पुणागुडा तसेच *सौ.मथुराताई मसुरे*( उपसरपंच ग्रामपंचायत पुणागुडा) तथा सर्व सदस्यगण ग्रामपंचायत पुणागुडा हे होते. कार्यक्रमाला गावातील समस्त आदरणीय मंडळी उपस्थित होती.कार्यक्रमाचे संचालन *श्री. शेरकी सर* तर आभार प्रदर्शन *श्री. तोडसे**सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या नंतर शाळेत 
*स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्य* शाळेत तिरंगा ध्वज प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, *एक पेड माँ के नाम* अंतर्गत वृक्षारोपण, तसेच माता पालक गटांतर्गत माता गौरव सोहळा इत्यादी उपक्रम घेण्यात आले. या सर्व उपक्रमात *कु.पुष्पा राधेश्याम गौतम* सहायक शिक्षिका पुणागुडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




Post a Comment

0 Comments