Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

आसापूर येथील नळ योजना तात्काळ सुरु करा*अन्यथा पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन करण्यात येईल-सुदाम राठोड

*आसापूर येथील नळ योजना तात्काळ सुरु करा*

अन्यथा पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन करण्यात येईल-
सुदाम राठोड

हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी 

जिवती:- ग्रामपंचायत आसापूर अंतर्गत मौजा आसापूर येथील नागरिकांनी सुदामभाऊ राठोड यांना पत्र देऊन माहिती दिली कि आसापूर येथे 2022 मध्ये जल जिवन मिशन अंतर्गत नवीन नळ योजना मंजूर झाली होती आणि 16 महिन्याचं करार झाला होता परंतु खेद जनक बाब अशी आहे कि आता 2025 आलं तरी काम अपुरे आहे. जसे कि विहीर ते पाण्याची टाकी - पाईप लाईन झालेली आहे पण काही ठिकाणी दीड ते दोन फुटावर पाईप बुजवून आहे. ते पाईप काही दिवसांनी उघड्यावर येणार व टाकीचे बांधकाम पूर्ण झालं पण प्लास्टर बाकी आहे व गावात पाईप लाईन 2016-17 मधील त्याच लाईनला जोडून द्यायचं असं ठेकेदारच म्हणणं आहे आणि जुन्या नळ योजनेला कनेक्शन देण्यासाठी गावातील लोकांचं विरोध आहे. व गावात प्रत्येक कुटुंबाच्या घरापर्यंत नवीन पाईप लाईन आणि नळ तोटी बसवून द्यावे अश्या प्रकारचा पत्र आसापूर वासियांनी सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड यांना दिले सुदाम राठोड यांनी तात्काळ संबंधित विभागाशी चर्चा करून नळ योजना काही दिवसातच सुरु करण्यात यावी अशी मागणी केली अन्यथा टाकी वर चढून विरुगिरी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला.

Post a Comment

0 Comments