जिवती तालुका प्रतिनिधी
राहुल मसुरे
८ मार्च हा दिवस संपुर्ण जगात महीला दिन म्हणुन साजरा केल्या जातो.
चंद्रपूर जिल्ह्यातील अती दुर्गम भाग म्हणुन ओळखल्या जात असलेल्या तालुक्यातील पुनागुडा गाव ह्या गावात आज रमाबाई जयंती व जागतीक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला व कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महीलानी सहभाग घेतला.
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक आचार्य सोमाजी गोंडाने सर हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम.पंचायत चे सरपंच रशिका बाई जोंधळे होत्या व सुत्र संचालन आरतीताई गायकवाड यांनी केले.व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्विटी ताई जोंधळे यांनी केले आणी कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन महीला बचत गटातील महीला व आरती ताई गायकवाड ; स्वीटी ताई जोंधळे,अस्मीताताई मसुरे , मिराताई वाघमारे,दिपाताई गायकवाड (ग्राम पंचायत सदस्या) तसेच शोभा ताई वाघमारे यांनी केले.असुन दिवस भर क्रिडा सम्मेलन व लंगडी ,संगित खुर्ची कब्बडी चे सामने व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले.



0 Comments