*जिवती तालुक्यातील गोंडवाना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविले "रासयो' शिबिर.*
*शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी.*
जिवती तालुका प्रतिनिधी
राहुल मसुरे
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात श्रमाचे महत्त्व वाढावे व सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी तसेच सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने गोंडवाना महाविद्यालय जिवतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने धोंडार्जूनी येथे सात दिवसीय विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात स्वच्छता, आरोग्य, श्रमदान, शिक्षण, संस्कार यावर आधारित विशेष कार्य करण्यात आले. सदर शिबिराचे अध्यक्षस्थानी गजानन गोदरू पाटील जुमनाके अध्यक्ष, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था (माणिकगड) जिवती हे होते. शिबिराचे उद्घाटन सौ. रंजना अविनाश जुमनाके सरपंच, ग्रामपंचायत धोंडाअर्जुनी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य नरसिंग लिंबोरे व उपसरपंच शमशुद्दीन शेख व मान्यवर उपस्थित होते. सात दिवशीय विशेष शिबिरात विद्यार्थ्यांनी ग्रामसफाई, स्वच्छता, शोषखड्डे, नाली स्वच्छता, बंधारे इत्यादी श्रमदानाचे कामे केली. सांस्कृतिक कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण जागृती, आरोग्य विषयी जागृती केली, शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव मडावी सचिव, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था,(माणिकगड) जिवती हे होते, प्रमुख पाहुणे प्रा. सुग्रीव गोतावळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्राचार्य.डॉ.पांडुरंग सावंत यांनी केले.व प्रास्ताविक, प्राध्यापिका.कु.शुभांगी तोडसाम मॅडम यांनी केले तर कार्यक्रमा चे आभार प्रदर्शन, प्राध्यापक. कांबळे सर यांनी करुन अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला.



0 Comments