Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

पडोली–नागपूर रोडवरील सर्व्हिस रोडवर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईची मागणीकुलदिप भाऊ चंदनखेडेमनविसे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपुर

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


पडोली–नागपूर रोडवरील सर्व्हिस रोडवर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईची मागणी
कुलदिप भाऊ चंदनखेडे
मनविसे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपुर


चंद्रपूर, दि. २१ सप्टेंबर २०२६ :
पडोली–नागपूर रोडवरील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रक, अवजड वाहने तसेच इतर वाहने रस्त्याच्या कडेला व सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे उभी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून नागरिक व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवजड वाहने दिसून न आल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच सर्व्हिस रोडचा वाहतुकीसाठी योग्य वापर करता येत नसल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप सुनील चंदनखेडे यांनी मा.प्रादेशिक परिवहन अधिकारी, मा. वाहतूक निरीक्षक,चंद्रपूर, ठाणेदार साहेब पडोली पोलीस स्टेशन चंद्रपूर यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत—
पडोली–नागपूर रोडवरील सर्व्हिस रोडची तातडीने पाहणी करण्यात यावी.
सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे उभी असलेल्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
अवजड वाहने सर्व्हिस रोडवर दीर्घकाळ उभी राहणार नाहीत यासाठी नियमित गस्त व तपासणी करण्यात यावी.
आवश्यक त्या ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक व वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात यावी.
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर हटविण्याची तातडीची कारवाई करण्यात यावी.
भविष्यात अशा प्रकारची अनधिकृत पार्किंग होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. 
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेंदन देत अस्ताना किशोर भाऊ मडगुलवार जिल्हा सचिव क्रिष्णा गुप्ता रुग्ण मित्र राजुभाऊ देवागण शुभमं वाढंरे विक्रम बोरकर निक्की यादव
उपस्तीत होते

Post a Comment

0 Comments