Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जनतेचा आवाज दाबू नका… अन्याय सहन केला जाणार नाही! *लोकशाही मार्गाने जनआक्रोश धरणे आंदोलन**१५ अगस्ट स्वातंत्र्य दिनी*

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 


*जनतेचा आवाज दाबू नका… अन्याय सहन केला जाणार नाही! 

*लोकशाही मार्गाने जनआक्रोश धरणे आंदोलन*

*१५ अगस्ट स्वातंत्र्य दिनी*

*कुपवाड शहरातील सि. स. नं. ७७४, महावीर व्यायाम मंडळ नजिकच्या खुल्या भूखंडावर*
*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची अधिकृत मागणी*

दिनांक ०१/०४/२०२६ रोजी करण्यात आली होती.

परंतु चार महिने उलटूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले… 

याउलट, ठरावामध्ये कोणताही उल्लेख नसताना
 आमदार कै. शरद पाटील यांच्या नावाने स्मृती उद्यान उभारणीसाठी
 तब्बल ₹१.५ कोटी निधी मंजुरीचा प्रयत्न

ही केवळ प्रशासकीय चूक नाही…
 हा जनभावनांचा अपमान आहे!
हा संविधानिक मूल्यांवर घाला आहे!

पर्यायी जागेचा विचार शक्य :
   आमदार कै. शरद पाटील यांच्या स्मृती उद्यानास कोणताही विरोध नसून ते अन्य योग्य ठिकाणी उभारता येऊ शकते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ व्यक्तिमत्त्व नाहीत,
ते आमच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत 

त्यामुळेच आता संघर्ष अटळ आहे!

*जनआक्रोश धरणे आंदोलन 

 ठिकाण: सांगली महानगरपालिका मुख्यालय
📅 दिनांक: १५ ऑगस्ट २०२६ (शनिवार)

 आमच्या ठाम मागण्या:
बाबासाहेबांचा पुतळा तात्काळ उभारावा
बेकायदेशीर प्रस्तावाची चौकशी करावी
निधी मंजुरी प्रक्रियेची SIT चौकशी करावी
जनभावनांचा आदर करावा

*हा लढा न्यायाचा आहे… हा लढा स्वाभिमानाचा आहे!*

*फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील समविचारी सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य – राजगृह परिवार, सांगली जिल्हा.*

Post a Comment

0 Comments