चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*जिवती तालुक्यात काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या कथित गुत्तेदारी व राजकीय सहभागाबाबत चर्चांना उधाण*
*हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
जिवती:-जिवती तालुक्यात काही शासकीय कर्मचारी दुसऱ्या कंत्राटदाराच्या परवान्यावरून कथितपणे गुत्तेदारीची कामे करत असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. तसेच काही कर्मचारी पडद्यामागून राजकीय पक्षांच्या कामातही सक्रिय असल्याच्या चर्चा विविध स्तरांवर सुरू असल्याचे बोलले जात आहे.
या चर्चांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्पक्ष कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सेवा नियमांचे पालन करणे अपेक्षित असल्याने, या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे.
मात्र, या चर्चांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. संबंधित कर्मचारी किंवा प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नसून, या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास वास्तव स्पष्ट होऊ शकते, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या विषयावर सक्षम प्रशासनाने आवश्यक ती पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



0 Comments