Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 

*NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन*

सांगली, दि. 29 मे 2026 :

देशभर गाजत असलेल्या NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाद्वारे NEET परीक्षेतील गैरव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा संघर्ष प्रश्नपत्रिका फुटीमुळे व्यर्थ गेला असून देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी सांगली यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये *केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, NEET ची फेरपरीक्षा विनामूल्य घेण्याची मागणी, Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024 ची कठोर अंमलबजावणी, NTA ची सखोल चौकशी तसेच NEET परीक्षा UPSC मार्फत घेण्याची मागणी करण्यात आली.

तसेच शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण थांबवून व्यावसायिक कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी शिवाजी उर्फ पवन रमेश वाघमारे, ऋषिकेश माने, सिद्धार्थ पवार, अक्षय मागाडे (सम्यक विद्यार्थी आंदोलन, सांगली), तसेच संजय संपत कांबळे, प्रशांत संगाप्पा वाघमारे, संजय भुपाल कांबळे, हिरामन भगत, परशुराम कांबळे (वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन), अशोक लोंढे, मोहन साबळे, विनायक मोरे, मनोज सनदे, मधुकर शेस्वरे, सचिन कोलप, रोहित कांबळे, मानतेश कांबळे, विशाल धेंडे, रणजित कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments