Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

तालुका कृषी कार्यालय जिवती या कार्यालयाच्या संबंधित तालुक्यातील कामाची चौकशी करा- हकानी शेख

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

तालुका कृषी कार्यालय जिवती या कार्यालयाच्या संबंधित तालुक्यातील कामाची चौकशी करा- हकानी शेख 

जिवती:-चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या तालुका हा तेलंगणा सीमेला लागून असून. जिवती तालुका काही बाबतीत विकासापासून दूर असल्याचे खंत व्यक्त केले जात आहे. हकानी शेख मनसे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार यांनी तालुका कृषी कार्यालय जिवती या कार्यालयात माहिती अधिकार अंतर्गत एकूण ५ मुद्द्यावर माहिती मागितली असता. माहिती मिळाली नाही. मागितलेली माहिती.१)आय.डब्लू.एम.पी. हि योजना तालुक्यातील किती गावात राबविण्यात आली.२)या योजने द्वारे कोणती कामे करण्यात आली गावनिहाय व गटनिहाय या कामावर किती खर्च झाला.३) गावनिहाय किती.मा.ना.बा.सि.ना.बा.ढा.बा. स्ट्रेचर किती अस्तित्वात आहे. किती तुटफुट झाले त्याचे माहिती द्यावी.४) तालुक्यातील शेतकऱ्यांरी मोटार डिझेल पंपाने पिकांना पाणी देतात त्यांचे जीपीएस कॅमेरा द्वारे फोटो व यशोगाथा देण्यात यावी,५) वरील प्रकल्पाच्या समितीचे सभेची रजिस्टर फोटो अंदाजपत्रक मापन पुस्तक. प्रशिक्षणावरील खर्च संपूर्ण कामाचे निया यशोगाथा व जीपीएस कॅमेरा द्वारे लोकेशन फोटो सहित सत्य प्रतीत देण्यात यावी अशी माहिती. माहिती अधिकार अर्जामध्ये मागण्यात आली होती. परंतु माहिती मिळाली नाही म्हणून अर्जदारांनी प्रथम अपिलीय अर्ज कार्यालयात दाखल केला. प्रथम अपिलय अर्जाची दखल घेऊन दि.०२/१२/२०२५ रोजी अपिलीय अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी जिवती यांच्या कक्षात सुनावणी झाली आणि एकूण ५ मुद्यापैकी २ मुद्द्याची माहिती अर्जदारास ८ दिवसात देण्यात यावी असा आदेश प्रथम अपिलीय अधिकारी यांनी जन माहिती अधिकारी यांना दिला, मात्र तब्बल १४ दिवसांनी.२ मुद्द्याची माहिती देण्यात आली. ती पण माहिती अपूर्ण देण्यात आली. आठ दिवसात राहिलेली अपूर्ण माहिती देण्यात येईल.असे जन माहिती अधिकारी यांनी सांगितले परंतु दोन मुद्द्याची अपूर्ण माहिती आतापर्यंत देण्यात आली नाही. याचा अर्थ निकष असा निघतो की जी माहिती मागितली होती त्या कामात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा संशय अर्जदाराला निर्माण झाला आहे. म्हणून अर्जदाराने जिल्हा कृषी अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आला व निवेदनातून भ्रष्टाचाराची पोलखोल व्हावी अशी मागणी करण्यात आली. आपण मागितलेल्या माहितीच्या कामाची चौकशी करावी जे दोषी आढळणार त्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कारवाई करावी. केलेल्या चौकशीच्या व कारवाईच्या अहवाल संबंधित निवेदन करताना देण्यात यावा. निवेदनाची दखल घेऊन ८ दिवसाच्या आत चौकशी करण्यात यावी व कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास हकानी शेख तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल याची दक्षता घ्यावी.असा इशारा देण्यात आला.

Post a Comment

0 Comments