Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष ८ वे डोंबिवली येथे संपन्न.*

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 


*एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष ८ वे डोंबिवली येथे संपन्न.*
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन - सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट प्रोडक्शन हाऊस आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष ८ वे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी, डोंबिवली पश्चिम रेतीभवन बिल्डिंग, २रा मजला येथे मोठया उत्साहात पार पडली, या स्पर्धेचे परिक्षण अशोक हंडोरे सर यांनी केले.
सदर स्पर्धेमध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतला व आपली कला सादर केली, डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग व दुर्वा एडुटेंमेंट प्रोडक्शन हाऊस यांच्याकडून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस रोख रक्कम व प्रमाणपत्र परिक्षकांच्या हस्ते देण्यात आले, तसेच काही कलाकारांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी सर्व कलाकारांना परिक्षक अशोक हंडोरे सरांनी अभिनय व त्याचे विविध अंग याविषयी थोडक्यात पण महत्वपुर्ण मार्गदर्शन केले त्यामुळे सर्व कलाकार खुश झाले.
संस्थेचे संस्थापक व स्पर्धा आयोजक डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी सर्व सहभागी कलाकारांचे आभार व्यक्त केले, तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेची सांगता केली.

Post a Comment

0 Comments