महाराष्ट्र संवाद न्युज
"गडहिंग्लज येथे माहिती अधिकार फेडरेशनचे भिक मागो आंदोलन
गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
गडहिंग्लज तहसील कार्यालय परिसरात खाजगी एजंट बसवून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत आज माहिती अधिकार फेडरेशनच्या वतीने अनोखे भिक मागो आंदोलन करण्यात आले. तहसील व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन जोरदार घोषणाबाजीसह पार पडले.
फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने नागरिकांसाठी विविध योजना, प्रमाणपत्रे, व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, तहसील कार्यालयात काही खाजगी एजंट बसून नागरिकांना लुबाडत आहेत. याविरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.या आंदोलनावेळी फेडरेशनच्या गडहिंगलज तालुका अध्यक्ष ईश्वर घाळी यांनी हातात ताट घेऊन व प्रतीकात्मक भिक मागून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. प्रशासनाने तात्काळ हे एजंट हटवून थेट नागरिकांना सेवा देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
तहसील व उपविभागीय अधिकारी यांना यासंदर्भात निवेदनही देण्यात आले असून, जर तातडीने कार्यवाही न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माहिती अधिकार फेडरेशनने दिला आहे.
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर भीक मागो आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन करून ईश्वर घाळी यांनी रुपये 32 जमा झालेली रक्कम तहसीलदार यांना चलन ऑनलाईन भरली व दोषींवर कारवाई करून लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांनी निवासी नायब तहसीलदार यांना दिले सदर आंदोलनस्थळी जिल्हाध्यक्ष शरद पवार, विनायक यादव, गुंडोपंत सुतार, सचिन पाटील,विजय कोरवी,विजय पन्हाळकर जगदीश गुरव, दिंगबर विटेकरी, महादेव नाईक, अंकुश लोहार, अर्जुन नाईक, स्वप्निल कुलकर्णी, बाळू कोणकेरी इत्यादी माहिती अधिकार कार्यकर्�



0 Comments