Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

आईनेच केली पोटच्या तिन मुलींची हत्या


महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

उत्तर प्रदेशातील बागपत मधील टीकरी कसबातील पट्टी भोजान गावातून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. येते एका जन्मदात्या मातेने आपल्याच पोटच्या तीन मुलींची हत्या करून त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंजन वय 7 वर्ष, किट्टू वय 2 वर्ष आणि मीरा वय 5 महिने असे हत्या करण्यात आलेले तिन्ही मुलीचे नाव आहे, तेज कुमारी वय 29 वर्ष असे महिलेचे नाव असून कौटुंबिक त्रासाला कंटाळून महिलेने हे खळबळजनक पाऊल उचलले.
तेज कुमारी हिने घरगुती वादातून तिच्या तीन निष्पाप मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडालीय. दरम्यान या घटनेची माहिती होताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत तपास सुरू केलाय.

Post a Comment

0 Comments