Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शेणगावात जशने ईद- ए-मिलादुन्न नबी उत्साहात संपन्न*

*शेणगावात जशने ईद- ए-मिलादुन्न नबी उत्साहात संपन्न* 
हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी 

जिवती:- इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद साहेब यांची जयंती जगात मोठ्या उत्साहाने साजरी करतात. जिवती तालुक्यातील शेणगाव येथे रजा जमा मस्जिद कमिटी तसेच मुस्लिम बांधवांनी पवित्र ईद-ए-मिलाद निमित्य गावातून जुलूस मिरवणूक काढून बंधुता, शांतता आणि प्रेम यांचे प्रतीक दिले. जुलूस मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पोहोचतात डॉ बाबासाहेब पुतळा समितीचे पदाधिकारी सदस्यांनी पाणी वाटप व चॉकलेट गोळ्या वाटप करून बंधुत्व व एकतेच्या संदेश या उत्साहाच्या माध्यमातून दिला. जुलूस परत मस्जिद जवळ आल्यावर महाप्रसादाचा आयोजन करण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. या जुलुसे मोहम्मदी मध्ये जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण जाधव साहेब, दुसरे ठाणेदार रहाटे साहेब, व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांरी तसेच रमाकांत माने पोलीस पाटील यांनी चांगला सहकार्य केला. मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले. या जुलुसे मोहम्मदी मध्ये रजा जामा मस्जिद कमिटीचे पदाधिकारी सदस्य तथा मस्जिदचे इमाम साहेब व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments