हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी
जिवती:- जिवती तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या तालुका म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर जिवती तालुका असल्यामुळे तेलंगाना राज्यातून बोगस डुबलीकेट दारू मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहनांमध्ये आणली जात असून. तालुक्यात बोगस दारू सप्लाय करणारा पिट्टीगुडा पोलीस स्टेशन हद्दीचा असल्याची खमंग चर्चा असून या दारू माफीचे संबंधित ठाणेदारा सोबत चांगले संबंध असल्याचे चर्चेला उधाण आले आहे. शेतकऱ्यांच्या बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाच्या दिवशी मरकागोंदी, नंदप्पा, माथाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस डुबलीकेट व देशी-विदेशी दारू अवैधरित्या महागड्या दरात विक्री करण्यात आली अशी मद्य शौकीन
करणाऱ्या कडून बोलले जात आहे. एका लोकप्रतिनिधींनी नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला अवैध दारूबद्दल व ठाणेदारा बद्दल बोलून दाखवले मी एक लोकप्रतिनिधी या नात्याने पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असून या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. दररोज गावात कुठे न कुठे पती-पत्नीचे किंवा गावात एकमेकांचे तंटे होत असल्याने व तसेच काही तरुण पिढीही दारूच्या आहारी गेल्याने त्या तरुण पिढीच्या आई-वडिल चिंताग्रस्त झाले आहे. म्हणून आपणास विनंती आहे की आपण गावाची व परिसरातील अवैध दारू विक्री बंद करावी, परंतु ठाणदराचे उत्तर असे होते की तुम्ही दारू पकडून द्या. मी कारवाई करतो. याचा अर्थ असा निघतो की अवैध दारू गावातील नागरिकांनी पकडून द्यावी तरच कारवाई करणार. गावातच तंटे व्हावे असेच हेतू ठाणेदराचे निघत असल्याचे त्या लोकप्रतिनिधींनी सांगितले. चर्चित चर्चा आहे की दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये "दोन" चार चाकी वाहने अवैध दारूने भरलेले पकडण्यात आले परंतु तालुक्यातील एका पोलिस वाल्यांनी मोबाईलवर संपर्क करून काय पैसे घ्यायचे ते घ्या आणि ते दोन्ही गाड्या सोडून टाका किती पैशाची डील झाली हे मात्र गुलदस्त्यातच आणि त्या दोन्ही गाड्या सोडण्यात आल्या अशी चर्चा चर्चेत आहे. पिट्टीगुडा ठाण्याच्या परिसरातील गावात अवैधरित्या देशी-विदेशी व तसेच बोगस डुबलीकेट दारू विक्री बंद करावी अशी मागणी सामान्य नागरिकाकडून केली जात आहे बघूया याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतील का व अवैध दारू विक्री बंद करतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



0 Comments