Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

एमडी सह 1 लाख मुद्देमाल सह आरोपी जप्त.

   
  वर्धा महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 
  हिंगणघाट पोलिसांनी नाकेबंदी करून एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मेफेड्रॅान (एम.डी.) हे अंमली पदार्थ व इतर साहित्य असा १ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २९ रोजी नुतन शाळा मैदान परिसरात करण्यात आली. शेख साबिर शेख नुर अली (२७) रा. शिवाजी वॉर्ड असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलिसांनी नाकेबंदी करून तपासणी केली. याच नाकेबंदीदरम्यान पोलिसांनी शेख साबिर शेख नुर अली याच्या जवळील साहित्याची पाहणी केली असता एका छोट्या प्लॉस्टिक पिशवीत एमडी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी शेख साबिर शेख नुर याला ताब्यात घेत त्याच्याकडून एमडी, एम. एच. ३२ ए. एल. ४३८९ क्रमांकाची दुचाकी, रोख ४७० रुपये असा एकुण १ लाख ८ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Seized property ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर यांच्या निर्देशानुसार दीपक वानखेडे, सुनील राम, प्रवीण बावणे, नरेंद्र आरेकर, निलेश सुर्यवंशी, सागर सांगोले, संतोष गिते, अतुल लोहकरे यांनी केली.

Post a Comment

0 Comments